JOb Updates : अशासकीय वसतिगृह अधीक्षक पदासाठी ७ जुलैपर्यंत अर्ज करा

Homeताज्या बातम्या

JOb Updates : अशासकीय वसतिगृह अधीक्षक पदासाठी ७ जुलैपर्यंत अर्ज करा

अहिल्यानगर, दि.३- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखालील असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह, अहिल्यानगर, कोपरगाव येथे निव्वळ

राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार
समता परिवारातील सर्व महिलांचा हा सन्मान ः स्वाती संदीप कोयटे
“नेमके खरे मुख्यमंत्री कोण आहे हेच कळत नाही”

अहिल्यानगर, दि.३- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहिल्यानगर यांच्या अधिपत्याखालील असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह, अहिल्यानगर, कोपरगाव येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात वसतिगृह अधीक्षक उमेदवाराची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी पात्रता असलेल्या माजी सैनिकांनी दि. ०७ जुलै २०२५ पर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे.

वसतिगृह अधीक्षक पदासाठी अर्जदार हा कनिष्ठ राजदिष्ठ अधिकारी म्हणून संरक्षण सेवेत ज्यांनी किमान ५ वर्ष सेवा केलेली असावी. अर्जदार निर्व्यसनी असावा. अर्जदारास संगणकाचे व लेखा विभगाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. हे पद निवासी असून इच्छुक अर्जदाराची तेथे राहण्याची तयारी असावी. वसतिगृहाची रोकड वही मेन्टेंन करता यावी. उमेदवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा.

अर्जासोबत सैन्य सेवेतील डिस्चार्च बुक, माजी सैनिक ओळख पत्र व आधार कार्डच्या छायांकित प्रती
जोडाव्यात. कामाचे ठिकाण अहिल्यानगर, कोपरगाव येथे असेल. विहित मुदतीत अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुलाखतीस कळविण्यात येईल. इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.

COMMENTS