सत्तेत रमणारा नव्हे तर ,जनविस्तारक नेता!

Homeमहाराष्ट्रदखल

सत्तेत रमणारा नव्हे तर ,जनविस्तारक नेता!

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि काही पदाधिकारी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश करते झाले.  धुळ्याचे आमदारांचा विचार केला तर ७५ वर्षे ज्यांच

काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?
उष्णतेचा कहर आणि अवकाळीचा प्रहार
राजकारणातील गाफीलपणा

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि काही पदाधिकारी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश करते झाले.  धुळ्याचे आमदारांचा विचार केला तर ७५ वर्षे ज्यांची नाळ काँग्रेस पक्षाची जोडलेली राहिली. ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात, याचा अर्थ  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष सत्ता आणि समन्वय व्यवस्थित सांभाळत असल्याचं हे निदर्शक आहे. कारण, माजी आमदार म्हणून कुणाल पाटील, त्यांचे वडील  रोहिदास पाटील हे राज्याचे दीर्घकाळ मंत्री राहिलेले; त्यांचे आजोबा चुडामन आनंदा पाटील हे तर पंडित नेहरू यांच्या पेक्षाही अधिक मतांनी भारताच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते.

चुडामण पाटील यांच्या विषयी तर अशी आख्यायिका सांगितली जाते की, सीए पाटील कोण आहेत, असा शब्द लोकसभेत उच्चारल्यानंतर तो शब्द यांना माहीत नव्हता; असं व्यक्तिमत्व निवडून गेलो होते. अशा कुटुंबातून ७५ वर्ष काँग्रेसची नाळ सोडून जेव्हा जातात याचा अर्थ भाजप नेतृत्व सध्याच्या काळात अगदी व्यवस्थित कार्यपद्धती आणि राज्य सरकार म्हणून काम करण्याची पद्धती, जनतेच्या हिताची आहे, यावर मात्र शिक्कामूर्त होतो.  कोणतीही कसोटी केवळ ईडी सीबीआय असं म्हणून चालत नाही. राजकारणामध्ये पक्ष बदल करत राहतात. परंतु, हा पक्ष बदल म्हणजे केवळ निष्ठा बदललेल्या नाहीत तर त्यांनी ज्या पक्षांमध्ये दीर्घकाळ काम केलेले आहे, त्या पक्षापेक्षा सध्या भाजपाच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकार जे काम करत आहे, ते अधिक योग्य आहे, यावर हे शिक्कामोर्तब आहे. अशा प्रकारची घोडदौड महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या दीर्घकाळापर्यंत हे चालू राहील .

नेत्यांच्या पक्षप्रवेशामागे आमदार राहुल कुल हे मुख्य सूत्रधार होते, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कुल हे पुणे जिल्ह्यात भाजपचे एक प्रभावी स्थानिक नेतृत्व मानले जातात. मागील वर्षी झालेल्या राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील राहुल कुल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे बोलले जाते. या प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे भाजपने पुणे, धुळे आणि बारामती परिसरात आपली पाळंमुळे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात या सत्तेला किंवा भारतीय जनता पक्षाला जे पाठबळ प्रत्यक्ष फिल्डमध्ये मिळत आहे, ते निश्चितपणे वेगवेगळ्या समाजाच्या घटकातून मिळत आहे. त्यामुळे त्यांचा सामाजिक घटकातील विस्तार देखील वाढलेला आहे आणि हा विस्तार येत्या ३०-३५ वर्षापर्यंत त्यांना कोणताही धोका निर्माण करू शकत नाही.

कारण सर्व प्रवर्गातील आणि समाजस्तरातील पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळतो आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांचं कल्पक नेतृत्व आणि त्यांनी उभी केलेली माणसे ही फार महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. राजकीय सत्तेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील कार्य हे समाज घटकातील व्यापक वर्गाला आकर्षित करणारा असल्यामुळे या पुढील काळातही हे कार्य अधिक प्रभावीपणे होत राहील, यात शंका असण्याचे कारण नाही.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे केवळ खुर्चीच्या सत्तेत रमत नाही तर प्रत्यक्ष जनतेत जाऊन ते आपल्या पक्षाचा जनविस्तार करण्यात अधिक मजबूत भूमिका निभवतात. हे आतापर्यंत दिसणारे वास्तव आहे आणि त्यामुळे ते सत्तेचत दीर्घकाळ राहतील.

COMMENTS