डॉक्टरांनी सायकलवर केली पंढरपूर वारी

Homeमहाराष्ट्र

डॉक्टरांनी सायकलवर केली पंढरपूर वारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी) - विठुरायाच्या दर्शनाची आस पूर्ण करण्यासाठी नगरमधील डॉक्टरांनी नगर ते पंढरपूर सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण केली. शनिवारी (

पोलीस इलेव्हन शिरूर ठरले कर्जतच्या पैलवान चषकाचे मानकरी
सावरकरांचा जन्मदिवस ’स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून होणार साजरा
चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – विठुरायाच्या दर्शनाची आस पूर्ण करण्यासाठी नगरमधील डॉक्टरांनी नगर ते पंढरपूर सायकलवारी यशस्वीरित्या पूर्ण केली. शनिवारी (28 जून) पहाटे 5 वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मिश्रा यांनी चांदणी चौकात झेंडा दाखवून डॉक्टरांच्या सायकलवारीला प्रारंभ झाला.

या वारीत डॉ. प्रशांत तुवर, डॉ. राहुल पंडीत, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्रदीप चोभे, डॉ. गणेश बडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. दिनेश पाटोळे, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. अमित थोपटे, डॉ. शिवराज गुंजाळ, डॉ. प्रवीण कराळे, डॉ. मंदार भोसले, डॉ. महेश घोडके, अभिजीत घोडके, साई पाटोळे, संजीवकुमार बारगळ यांचा समावेश होता.

चांदणी चौकातून निघाल्यानंतर रूईछत्तीशी व मिरजगाव, निमगाव डाकू, करमाळा आदी ठिकाणी चहापाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. शेटफळ या गावी सर्वांनी मुक्काम केला. रविवारी (दि. 29) उर्वरित 30 किलोमीटरचे अंतर सर्वांनी वारकरी पोषाखात पूर्ण केले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेत स्नान केल्यानंतर सर्वांनी विठ्ठल मंदिराचे मनोभावे मुखदर्शन घेतले. संपूर्ण प्रवासात सर्वांचाच उत्साह शेवटपर्यंत टिकून होता.

सलग तिसर्‍या वर्षी डॉक्टरांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पंढरपूर सायकलवारीचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कौतूक केले. पुढील वर्षीही पंढरपूर सायकलवारी पूर्ण करण्याचा मानस डॉक्टरांनी या वेळी व्यक्त केला. सायकल चालविणे आरोग्यास हितकारक असल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, असे आवाहनही डॉक्टरांनी केले.

COMMENTS