बालविवाह ; दोन्ही कुटुंबे आणि लॉन्स मालकावर गुन्हा दाखल

Homeमहाराष्ट्र

बालविवाह ; दोन्ही कुटुंबे आणि लॉन्स मालकावर गुन्हा दाखल

नाशिक प्रतिनिधी / नाशिकमधील बालविवाह प्रतिबंधक समितीने मिळोलेल्या माहितीनुसार संबंधितांची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याचे पत्र म्हसरूळ पोलिसां

भारताच्या हरितगृह वायू उत्सर्जनात घट
एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

नाशिक प्रतिनिधी /

नाशिकमधील बालविवाह प्रतिबंधक समितीने मिळोलेल्या माहितीनुसार संबंधितांची चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्याचे पत्र म्हसरूळ पोलिसांना दिले होते. तपासात बालविवाह झाल्याचे उघड झाल्याने बालविवाहास खतपाणी घालणाऱ्या लॉन्स मालकासह दोन्ही कुटुंबातील प्रौढ संशयित व भटजीवर अखेर उपनगर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागेश पवार, लक्ष्मी पवार (रा. बोरगड, म्हसरूळ), मीनाक्षी शिंदे, पंडीत शिंदे (दोघे रा. नाशिकरोड), उपनगर येथील श्रीही लॉन्सचे संचालक व मंगलाष्टके म्हणून विवाह लावणारा भटजी अशी संशयितांची नावे आहेत.

संशयितांनी २३ मे २०२५ रोजी उपनगर येथील श्री हरि लॉन्समध्ये (Shri Hari Lawns) सायंकाळी चार वाजता बोगड येथे राहणाऱ्या १९ वर्षे १ महिना २७ दिवसांच्या तरूणाचा उपनगर हद्दीत राहणाऱ्या १६ वर्ष अकरा महिने बारा दिवसांच्या बालिकेशी विवाह लावला. दोघांचे विवाहासाठीचे वय पूर्ण नाहीं’ असे माहिती असतांना देखील असे कृत्य केले, संशयितांवर आता बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, याबाबतची फिर्याद म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) उपनिरीक्षक मयूरी तुरे यांनी दिली असून तपास उपनगर पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक बर्वे करत आहेत. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंतचा कारावास व एक लाखांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. संशयितांना (Suspected) आज चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

कायदा काय सांगतो…

या कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तसेच मुलाचे २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह करु नये. उल्लंघन केल्यास पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबे, वाजंत्री, भटजी, जेवण बनविणारे, मंदिर असल्यास त्याचे ट्रस्टी, व-हाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. १० जानेवारी २००७ रोजी भारत सरकारने हा कायदा लागू केला आहे. या कायद्यात एकूण २१ कलमे आहेत.

तपासात निष्पन्न

बालविवाह प्रतिबंध कक्षास या बालविवाहाची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यामुळे थेट कारवाई करता येत नसल्याने व विवाह संपन्न होऊन गेल्याने कार्यालयाने म्हसरूळ पोलिसांना पत्रव्यवहार केला होता. यानुसार तुरे यांनी तपास केला असता विवाह थाटात झाल्याचे समोर आले. त्यानुसार, म्हसरुळ पोलिसांत झिरोने गुन्हा नोंदवून घटनास्थळ म्हणजेच विवाहाचे ठिकाण उपनगर पोलिसांच्या (Upnagar Police) हद्दीत असल्याने आता हा गुन्हा तपासासाठी उपनगरकडे पाठविण्यात आला आहे.

COMMENTS