Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण येथे शिकार प्रकरणी तीनजण ताब्यात

पाटण / प्रतिनिधी : पाटण येथे रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार केल्या प्रकरणी तीनजणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.याबाबत वनविभागाने दिलेल्या मा

प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करु : ना. उदय सामंत
तुळसण येथे बिबट्या दुचाकीच्या आडवा : चालक जखमी
लोणंद मधील नव्या पाण्याच्या टाकीचे उदघाटन कुणासाठी थांबलय?

पाटण / प्रतिनिधी : पाटण येथे रानडुक्कर वन्यप्राण्याची शिकार केल्या प्रकरणी तीनजणांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार, दि. 27 जून रोजी दुपारी 3.30 च्या दरम्यान वनविभागाला मिळालेल्या माहिती नुसार रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करून पाटण येथे आणल्याचे समजले असता वनविभागाने तात्काळ या गुन्ह्यातील आरोपी नारायण शिवाजी पवार (वय 45), उत्तम रामू पवार (वय 60 दोघेही रा. म्हावशी, ता. पाटण) व पंढरीनाथ यशवंत पाटील (वय 54, रा. येरफळे, ता. पाटण) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कार्यवाही उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे, वनपाल निलेश कुंभार, वनरक्षक निखिल कदम, वनरक्षक मोरगिरी रोहित लोहार, वनरक्षक पाचगणी विलास वाघमारे, वनरक्षक बहुले मेघराज नवले, वनरक्षक गोवारे राम मोटे, कायम वनमजूर संजय जाधव यांनी केली.

COMMENTS