Homeताज्या बातम्यादेश

भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली ः भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा मोठी झेप देशाचा जीडीपी प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था व

कोपरगाव तहसीलदार यांच्यावरील खोटा गुन्हा रद्द करावा : महसूल विभागाचे लाक्षणिक उपोषण
राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
 अपघात टाळण्यासाठी  एसटी महामंडळाचा नवीन उपक्रम

नवी दिल्ली ः भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा मोठी झेप देशाचा जीडीपी प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे द्योतक असून, भारत देश आता 333 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. यासह आपण जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहोत. जीडीपीच्या बाबतीत जगात अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तर चीन दुसर्‍या स्थानावर असून, जपान तिसर्‍या स्थानावर आहे. तर जर्मनी चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या वाढीचा वेग पाहता, अर्थशास्त्रज्ञांचा अंदाज आहे की भारत पुढील चार वर्षांत म्हणजे 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. येत्या काही वर्षात अमेरिका, चीन आणि भारत या जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. भारताची अर्थव्यवस्था अगदी वेगाने पुढे जात असल्याचा हा पुरावा आहे. यापूर्वी मोदी सरकारने भारत 2024-25 या वर्षापर्यंत 4 ट्रिलियन डॉलर्सचा पल्ला गाठेल असा विश्‍वास व्यक्त केला होता. मात्र, आता 2024 हे वर्ष सुरू होण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेने हा टप्पा गाठला आहे.  सध्या ग्लोबल जीडीपीच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ चीन, जपान आणि जर्मनीचा क्रमांक लागतो. भारताने या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेत, युनायटेड किंगडमला मागे टाकलं आहे. विकासाची गती पाहता, पुढील तीन वर्षांमध्ये भारत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकून जगातील तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ शकतो; असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
जीडीपीने प्रथमच 4 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा पार केला. आता यासह भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनी आणि भारताच्या जीडीपीमधील फरक आता खूपच कमी झाला आहे. भारत सरकारने देशाला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली आहे. सरकारच्या ध्येयाच्या दिशेने ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच सांगितले होते की, 2027 पर्यंत भारत फक्त जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार नाही, तर भारताचा जीडीपी 5 ट्रिलियन पेक्षा जास्त होईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही असाच अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आणि जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. भारताचा आर्थिक विकास दर आता पाहिल्यास, इतर कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 7.8 टक्के होता. त्यापूर्वी, गेल्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 7.2 टक्के दराने वाढली होती. रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहणार आहे. भारताची अर्थव्यवस्था दुसर्‍या तिमाहीत 6.5 टक्के दराने, तिसर्‍या तिमाहीत 6 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.7 टक्के दराने वाढणार आहे. तर आयएमएफच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था 2023 आणि 2024 मध्ये 6.3 टक्के दराने वाढेल. याचाच अर्थ भारत ही आगामी काळातही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार आहे.

भारताची अर्थव्यवस्था वेगवान- अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा 25.5 ट्रिलियन डॉलर आहे. तर 18 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर जपानचा 4.2 ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. त्यामुळे जर्मनी आणि भारताच्या जीडीपीमध्ये जास्त अंतर नसल्यामुळे भारत लवकरच जर्मनीला मागे टाकून चौथे स्थान पटकावू शकतो.

COMMENTS