Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहाय्यक आयुक्त संदीप भांड यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्रदान

अहिल्यानगर : एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले तथा सहाय्यक आयुक्त संदीप रमेश भांड यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपत

‘रेषा बोलतात…रेषा हसवतात !’ विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक व्यंगचित्रांचा अनोखा कार्यक्रम.
अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वारसाला नोकरी देण्यासाठी कार्यपद्धती तयार करा – उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम
नांदेड-नागपूर 361 राष्ट्रीय महामार्गावरील वृक्षतोड झाल्यामुळे सावली हरपली
Displaying 3654cf6b-903c-4679-a7ba-79b15deea2b0.jpg

अहिल्यानगर : एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले तथा सहाय्यक आयुक्त संदीप रमेश भांड यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती शौर्य पदक गुरुवारी प्रदान करण्यात आला. मुंबई येथील राजभवनात गुरुवारी सकाळी झालेल्या शानदार कार्यक्रमात हे पदक प्रदान करण्यात आले. गडचिरोली येथे दहा वर्षांपासून साहाय्यक आयुक्त म्हणून संदीप भांड हे सेवा बजावत आहेत.
संदीप भांड हे सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात नक्षल विरोधी अभियानात आहेत. यापूर्वी भांड यांना केंद्र सरकारचे पोलीस शौर्य पदक, आंतरिक सुरक्षा सेवा पदक, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक इंटेलिजन्स, भारतीय स्वातंत्र्याचे 75 वर्षे पूर्ण मेडल तर राज्य सरकारकडून स्पेशल फोर्स मेडल, विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहेत. सन 2016 पासून नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल गडचिरोली जिल्ह्यात स्वेच्छेने काम करत आहेत. पोलिस-नक्षल चकमकीत आतापर्यंत एकुण 9 नक्षलींचा एन्काउंटर पोलीस आयुक्त संदीप भांड यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात स्फोटकांसह नक्षलवाद्याला अटक केल्याने न्यायालयाने त्यास 15 महिन्यांची शिक्षादेखील सुनावली आहे. 2021 पासून कर्तव्याप्रती स्पष्ट निष्ठा दाखवून राज्य गुप्तचर विभागात सहायक आयुक्त पदावर काम करताना दोन वेळा नक्षलवादी आत्मसमर्पण (सरेंडर), दोन वेळा नक्षलवादी अटक, चार वेळा नक्षल दारूगोळा हस्तगत आणि सहा वेळा जिवंत स्फोटकांसह नक्षल डंप रिकव्हरी केली आहे.
खाकी वर्दीतील आयुक्त संदीप भांड हे समाजमनही ओळखून आहेत. भामरागड पोलीस ठाणे, जि.गडचिरोली येथे कोरोना काळात 2020 साली दिवाळीत गरीब लोकांसाठी स्वत:चे पगारातून गोड जेवण देवून सामाजिक बांधीलकी जपली. त्याची पोलिस खात्यातील वरिष्ठांनी तसेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कौतुक केले. भामरागड जि. गडचिरोली येथील एकुण 25 बेरोजेगार तरूणांना तेलंगाणा राज्यात सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी लावली.
महाराष्ट्र पोलिसच्या टेररिस्ट शुटर टिम फोर्स वनमध्ये कर्तव्य बजावले आहे. मुंबई क्राईम ब्रँच मध्ये सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये आयटी कायद्याशी संबंधित विविध गुन्ह्यांचा तपास करून राज्यातील तसेच परराज्यातील अनेक गुन्हेगारांना अटक केली. स्वेच्छेने पाच नॅशनल कमांडो प्रशिक्षणासह इतर 25 प्रशिक्षणे यशस्वीरित्या पूर्ण केले. साहाय्यक पोलीस आयुक्त संदीप भांड हे वांबोरी, ता. राहुरी येथील आहेत.

COMMENTS