Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून वसंत मोरे लढणार लोकसभा

वंचितकडून मोरे यांच्यासह 5 जागांवर उमेदवार जाहीर

पुणे : वंचित बहुजन आघाडीने आपली लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे.या यादीत एकूण 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. याम

मी परतीचे दोर स्वत कापले- वसंत मोरे
वसंत मोरेंचा मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र
चंद्रा गाण्यावर वसंत मोरे यांनी धरला ठेका

पुणे : वंचित बहुजन आघाडीने आपली लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी बुधवारी जाहीर केली आहे.या यादीत एकूण 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पुणे मतदारसंघासाठी मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर मंगलदास बांदल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये वंचितने उमेदवार न देता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
याआधी वंचितने पहिल्या यादीत एकूण 8 जागांचा समावेश होता. तर दुसर्‍या यादीमध्ये 11 जागांचा समावेश करण्यात आला होता. आतापर्यंत वंचितने 24 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तिसर्‍या यादीत उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात तीन उमेदवार मराठा उमेदवार आहेत तर एक लिंगायत तर एक मुस्लिम आहे. मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. पुणे लोकसभेसाठी इच्छूक असलेले मोरे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मोरे यांनी वंचितचे समर्थन मिळवण्यासाठी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. जरांगे यांनी मराठा समाजाचे उमदेवार देण्याबाबत घुमजाव केल्यानंतर आता पुण्यातून वंचितकडून मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे.

वंचितची तिसर्‍या यादीतील उमेदवार
नांदेड – अविनाश भोईकर
परभणी – बाळासाहेब भुजंगराब उगळे
औरंगाबाद -अफसर खान
पुणे – वसंत मोरे
शिरुर – मंगलदास बांदल

COMMENTS