Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगबुडी नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भरधा

पालघरमधील देहरजी प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटीच्या खर्चास मान्यता
बांधकाम पूर्ण झालेली रुग्णालये कार्यान्वित करून जनतेच्या सेवेत आणावीत- मंत्री प्रकाश आबिटकर
भुसावळमध्ये नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे नगराध्यक्षपद रद्द; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने केली कारवाई

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट नदीच्या 100 ते 150 फूट खोल पात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा समावेश आहे.
ही कार विवेक श्रीराम मोरे यांच्या मालकीची असून, कारमधून मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, विवेक श्रीराम मोरे, परमेश पराडकर या प्रवाशांपैकी मेघा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे व श्रेयस सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर कारचा चालक विवेक मोरे व परमेश पराडकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS