Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाकिस्तानी झेंडा जाळून पहलगाम हल्ल्याचा निषेध 

संगमनेर ; जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एक एकाला ठार केले. .या

जमिनीचा वाद पेटला, रस्त्यात अडवून शेतकर्‍याचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून
फुले दांपत्याचे गुण अंगीकारले तरच सुदृढ समाज निर्मिती होईल : अशोक देवढे
पिंप्री राजा येथे कन्या दिन उत्साहात ; मुलींच्या जन्माचे स्वागत करा : जिल्हाधिकारी स्वामी
45e3ce39-0563-4842-8821-3cc60b3a3272.JPG

संगमनेर ; जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पोलिसांच्या वेशात आलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून एक एकाला ठार केले. .या भ्याड हल्ल्याचा संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून या  हल्ल्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध केला. पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणा देत संतप्त झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या हिरव्या झेंड्याचे दहन करत संताप व्यक्त केला. यावेळी महायुतीच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले . यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे रमेश काळे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, भाजपचे माजी नगरसेवक शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, सुदर्शन इटप, दिलीप कोल्हे, भारत गवळी, शशांक नामन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून केलेल्या अतिरेकी हल्ल्याचा महायुतीच्या वतीने  जाहीर शब्दात निषेध व्यक्त केला आणि अतिरेकांना केंद्र सरकारने चांगला धडा शिकवावा अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्या सुविद्यपत्नी निलम खताळ यांनी केंद्र सरकारकडे केली.

हिंदू पर्यटकांवर दहशत वाद्यांनी जो हल्ला केला आहे त्या सर्वच अतिरेकी संघटना खत्म करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पाऊल उचलावे, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजणे यांनी केली.

   पर्यटकांना दहशतवाद्यांनी ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळीबार करत ठार मारले, त्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी  मागील वेळी ‘ईट का जवाब, पत्थर से देंगे’ या युक्तीप्रमाणे केलेल्या सर्जिकल स्ट्राइक पेक्षाही मोठा सर्जिकल स्ट्राइक करून  हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. त्यापेक्षा ही मोठा हल्ला पाकिस्तानच्या अतिरेकी तळावर करून त्यांचे तळ उध्वस्त करावे, असे भाजपचे नूतन तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे  यांनी केंद्र सरकारकडे केली.

COMMENTS