निवडणूक आयोगाविरोधात ममतादीदींचे धरणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक आयोगाविरोधात ममतादीदींचे धरणे

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तास प्रचारबंदीची कारवाई केली.

मुलीला बोलल्याच्या रागातून वडिलांवर कुऱ्हाडीने हल्ला
जंगलात खेचत नेऊन केला गँगरेप; नंतर दगडाने ठेचून केली हत्या | LOKNews24
शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ

कोलकाता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने 24 तास प्रचारबंदीची कारवाई केली. आयोगाच्या या कारवाईविरोधात ममता यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मेयो रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. 

तृणमूल काँग्रेसने सकाळी पत्र लिहून धरणे आंदोलनासाठी रितसर परवानगी मागितली होती; मात्र एवढ्या कमी वेळात आंदोलनाला परवानगी देता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र ममता बॅनर्जी यांनी सकाळी 11.30 पासूनच धरणे आंदोलन सुरू केले. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते सातत्याने प्रश्‍न उपस्थित करत आहेत. भाजपसाठी निवडणूक आयोग धृतराष्ट्र बनले असल्याची घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसचे नेते करत आहेत. निवडणूक आयोगाने केलेली कारवाई ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि असंविधानिक आहे. निवडणूक आयोग पक्षपाती बनले आहे. भाजप नेत्यांवर त्यांच्याकडून कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला.

ममता यांनी केलेल्या एका वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली. निवडणूक आयोगाने ममता यांनी केलेल्या वक्तव्याची तीव्र शब्दात निंदा केली आहे. निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात ममता यांच्या काही वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला. निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे तृणमूल काँग्रेसने म्हटले. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी 12 एप्रिल हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले.

भाजपच्या सिन्हा यांच्यावरही कारवाई

भारतीय जनता पक्षाचे नेते राहुल सिन्हा यांनी आठ लोकांना मारायला हवे होते, असे चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यांच्यावरही निवडणूक आयोगाने कारवाई केली. त्यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी करण्यात आली, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

आंदोलन ममतांनी रेखाटली चित्रे

निवडणूक आयोगाविरोधातील धरणे आंदोलनात ममता व्हीलचेअरवर सहभागी झाल्या होत्या. त्या एकट्याच आंदोलक होत्या. आंदोलनाच्या वेळात त्यांनी चित्रे रेखाटली. त्यांच्या या चित्र रेखाटण्याच्या कृतीचे कौतुक झाले.

COMMENTS