महाराष्ट्रात आजपासून 15 दिवसांची टाळेबंदी ; जमावबंदी आदेश लागू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्रात आजपासून 15 दिवसांची टाळेबंदी ; जमावबंदी आदेश लागू

आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच; पण त्याआधी जीव वाचवणे आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे.

अकोलेकरांच्या दिवाळीची सुरमय सुरुवात
आंतरराष्ट्रीय योग दिवस जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचेल
उत्तरप्रदेशातील गँगस्टर अतीकचा मुलगा असदचा एन्काऊंटर

मुंबई/प्रतिनिधीः आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच; पण त्याआधी जीव वाचवणे आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या रात्री आठ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचे मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथेदेखील निर्बंध लागू होतील. उद्या रात्रीपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात 144 कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान 15 दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायच नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या काळात अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरूच राहणार आहे. लोकल, बस सुरू राहतील; पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणार्‍या वर्गाला येण्या-जाण्यासाठी  चालू राहतील. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचार्‍यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे लसीकरण बंधनकारक असेल. राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सात कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिले जातील. आता शिवभोजन थाळी पुढचा एक महिना मोफत दिली जाईल. महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळात राज्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा करून मुख्यमंत्री म्हणाले, की नोंदणीकृत घरेलू कामगारांना निधी देत आहोत. अधिकृत फेरीवाल्यांना एका वेळचे प्रत्येकी 1500 रुपये आपण देणार आहोत. स्वनिधी योजनेत फेरीवाल्यांची बँकांमध्ये खाती असल्यामुळे थेट खात्यांमध्ये पैसे जमा होतील. त्यांची संख्या पाच लाख आहे. आदिवासी बांधवांना खावटी सहाय्य योजनेतून एका वेळचे दोन हजार रुपये देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची कमतरता जाणवू लागली आहे. बेड्स मिळत नाहीत. रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढली आहे. काही कारखान्यांना विनंती केल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोनाच्या संकटावर या नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच इतर आपत्तींप्रमाणेच निकष लावून ज्यांच्या रोजीरोटीवर संकट आले आहे, त्यांना वैयक्तिक मदत द्यावी, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली आहे. निवृत्त झालेल्या डॉक्टर, परिचारिकांना मुख्यमंत्र्यांनी मदतीला, लढायला पुढे या, असे आवाहन केले.

उणीदुणी काढण्याची वेळ नाही

ही उणीदुणी काढण्याची वेळ आहे. सर्व राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे. आता उणीदुणी काढत बसलो, तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पंतप्रधानांनाही मी हीच विनंती केली, की देशातल्या सर्व प्रमुख राजकीय पक्षांना आवाहन करा, की राजकारण बाजूला ठेवा. आपण एकसाथ लढायला हवे, तरच आपल्याला या साथीवर नियंत्रण मिळवता येईल, असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले.

COMMENTS