Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकलसह बाईक रॅली

सातारा / प्रतिनिधी : 256 वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महाबळेश्‍वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी फलटण नगरी सज्ज
उर्दू शाळेत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीत अपहार; उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीचा आरोप
कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍यांचा धक्कादायक निकाल

सातारा / प्रतिनिधी : 256 वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने महाबळेश्‍वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीमध्ये महाबळेश्‍वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, स्वीप नोडल अधिकारी, मुख्यलिपिक आबाजी ढोबळे, करनिरीक्षक अमित माने, अंतर्गत लेखापाल, सचिन कदम, स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार, मुख्याध्यापक परमेश्‍वर माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्‍वर शहरात सायकल बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी सहभागी होते. रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

COMMENTS