Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगेंद्र यादवांच्या कार्यक्रमात वंचितचा राडा

अकोला : वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अकोल्यात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या एका कार्यक्रमादरम्यान मोठा राडा घातल्याचे पाहायला म

महायुतीचा सुपडा साफ करणार : मनोज जरांगे
शेअर मार्केट मधील ब्रोकरने घातला 15 लाखांचा गंडा
मंत्री भुजबळांच्या बेनामी संपत्तीच्या तक्रारी रद्द

अकोला : वंचित बहुजन आघाडीने सोमवारी अकोल्यात भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या एका कार्यक्रमादरम्यान मोठा राडा घातल्याचे पाहायला मिळाले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव भाषण करत असताना त्यांचा माईक हिसकावत योगेंद्र यादव यांचे भाषण बंद पाडले. तसेच खुर्च्यांची तोडफोड केल्याचे देखील पहायला मिळाले. अकोल्यातील जिल्हा परिषदच्या कर्मचारी भवनमध्ये हा प्रकार घडला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोल्यात महाराष्ट्र डेमोक्रेटीक फोरम आणि भारत जोडो अभियानाच्या वतीने योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ’लोकशाहीची सुरक्षा आणि आपले मत’ या चर्चेवर विचार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, योगेंद्र यादव यांचा नियोजितपणे सुरू असलेला कार्यक्रम बंद पाडण्यात आला. योगेंद्र यादव यांचे भाषण सुरू असताना वंचित कार्यकर्ते तिथे आले. संविधानाच्या दृष्टिकोनातून काय चर्चा झाल्या, जवाब दो.. जवाब दो…असे नारे देत वंचितच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

COMMENTS