Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेळाडूंनी खिलाडूवृत्ती स्वीकारून नावलौकिक मिळवावा : मोनिकाताई राजळे

पाथर्डी : कुस्ती हा खेळ अंगमेहनतीचा असून या प्रचंड मेहनतीबरोबरच आपण खिलाडूवृत्ती अंगी बाळगली पाहिजे, तसेच जिद्द व चिकाटी ठेवत यशाची शिखरे गाठत आप

कारणे देवू नका, कामे तातडीने पूर्ण करा ; आ.आशुतोष काळेंची ठेकेदार अधिकार्‍यांना तंबी
‘उद्धव काका तुमचा मुलगा मंत्री’, मुंबईतील वांद्रेत विद्यार्थ्यांचं आंदोलन l LokNews24 —————
वादळामुळे सोलर पॅनल भुईसपाट ; शेतकरी चिंतेत

पाथर्डी : कुस्ती हा खेळ अंगमेहनतीचा असून या प्रचंड मेहनतीबरोबरच आपण खिलाडूवृत्ती अंगी बाळगली पाहिजे, तसेच जिद्द व चिकाटी ठेवत यशाची शिखरे गाठत आपल्या राज्याचे व देशाचे नाव जगभरात झळकावून नावलौकिक मिळवावा असे प्रतिपादन आ मोनिकाताई राजळे यांनी केले.त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व बाबुजी आव्हाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर क्रीडा विभाग उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, क्रीडा अधिकारी प्रियांका खिंडरे, भाऊराव वीर, सचिव संतोष भुजबळ, मा. नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, नंदूशेठ शेळके, बंडू बोरुडे, शुभम गाडे, रमेश हंडाळ, महेश बोरुडे, प्राचार्य डॉ बबन चौरे, कोमल वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अभय आव्हाड म्हणाले, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ही जिल्ह्यात प्रथमच बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित होत असून हा महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. खेळाडूंनी स्पर्धेचा सराव करताना आत्मिविश्‍वास, कठोर मेहनत, व खिलाडूवृत्ती ही त्रिसूत्री अंगीकारल्यास ते कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊन यशस्वी होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेती महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल वाकळे होय. यावेळी त्यांनी सर्व कुस्तीपटूना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. सचिन शिरसाट, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ विजय देशमुख, पप्पू शिरसाट, अविनाश घुगे, अजय शिरसाट, एकनाथ पालवे, रामदास दहिफळे, रावसाहेब मोरकर आदी प्रयत्नशील आहेत. सदर स्पर्धेस महाराष्ट्र राज्यातून 243 खेळाडू सहभागी झाले आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, सुत्रसंचालन प्रा. शेखर ससाणे तर आभार डॉ विजय देशमुख यांनी मानले.

COMMENTS