Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले येथे सर्वधर्मीय वधू-वर मेळावा उत्साहात

मेळाव्यासाठी तब्बल 700 पालकांची उपस्थिती

अहमदनगर ः जिल्ह्यातील अकोले येथील अंबिका लॉन्स मंगल कार्यालय येथे नुकताच सर्वधर्मीय वधू-वर मेळावा संपन्न झाला. अहमदनगर जिल्हासह नाशिक, मुंबई, पुण

ग्रामीण रुग्णालयाची ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी
तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत तीन घरफोडीच्या घटनाची नोंद 
मधुकर म्हसे पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर ः जिल्ह्यातील अकोले येथील अंबिका लॉन्स मंगल कार्यालय येथे नुकताच सर्वधर्मीय वधू-वर मेळावा संपन्न झाला. अहमदनगर जिल्हासह नाशिक, मुंबई, पुणे, संभाजीनगर, जळगाव येथील विवाह इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घेतला. या मेळाव्यासाठी तब्बल 700 पालक उपस्थित होते. 210 विवाह इच्छुक मुलामुलींनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली.
मेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप रुपवते, सेवानिवृत्त उपायुक्त कृषी संचालक प्रवीण गवांदे, इंजि. अरविंद जाधव डॉ. विजय पवार प्रसाद डांगळे अशोक धनंधरे, आर. डी. आढाव या मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती बौद्धाचार्य व सामाजिक कार्यकर्ते ए.पी. बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण रुपवते, समाज भूषण महागायिका कल्पनाताई सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते भीमदास जगधने, अ‍ॅड. एस. व्ही. जाधव, कैलास जाधव या मान्यवरांनी शुभेच्छा विचारातून सामाजिक संदेश दिला. मंगल परिणय विवाह सूचक मंडळाचे संचालक भाऊसाहेब देठे यांचे कार्य वीस वर्षापासून मंडळात  विवाह जमल्याचे  अभिप्राय-   अनुभव काही मान्यवरांनी स्टेजवर सांगितले. नावनोंदणी झालेल्या मुला मुलीची स्टेजवर प्रत्येकी फॉर्म वाचून परिचय करून देण्यात आला. स्टेजवर पाहणी करून नंतर माहिती देऊन सायंकाळपर्यंत विवाह जुळण्यासाठी पालकांनी एकमेकांची भेट घेऊन चर्चा केली. मेळाव्याचे सूत्रसंचलन सुदेश जगताप यांनी केले. संतोष शेठ बाणाईत, जनार्दन गवांदे, अरुण हरनामे, डॉ. सुनिल आढाव, गवनेर सरोदे, प्रा.अरुण पवार, उषा सरोदे, गुलाबराव जाधव, जयश्री जगताप मॅडम,अंकुश आहेर, सतिष जगताप, रमेश जगताप, किरण देठे, रामहारी नेहे,संजय शिंदे आदींनी मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

COMMENTS