Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी नदीपात्रात जलसमाधीचा धनगर समाजाचा इशारा

नेवासा फाटा : धनगर समाजाच्या आरक्षणाकरिता नेवासा फाट्यावर बसलेल्या समाज बांधवांच्या उपोषणाचा सातवा दिवस असला तरी  सरकारने व स्थानिक प्रशासनाने कु

BREAKING: खा.डॉ. सुजय विखे यांनी थेट दिल्लीवरुनआणला रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा | Lok News24
28 वर्षांनी पुन्हा भरली इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा
खारे कर्जुने येथील जुनी विहिर खचली

नेवासा फाटा : धनगर समाजाच्या आरक्षणाकरिता नेवासा फाट्यावर बसलेल्या समाज बांधवांच्या उपोषणाचा सातवा दिवस असला तरी  सरकारने व स्थानिक प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आम्ही शुक्रवारी अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावरील गोदावरी नदीत जलसमाधी घेणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी देवून सरकारचे लक्ष वेधले आहे. धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  बोलतांना कोळेकर यांनी उपोषण कर्त्याच्या वतीने ही माहिती दिली.

धनगर समाजाला एसटी वर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नेवासे फाट्यावर उपोषण सुरूच असून मंगळवारी उपोषणाचा सातवा दिवस होता प्रल्हाद चोरमारे व रामराव कोल्हे या दोघा उपोषणकर्त्याची प्रकृती खाल्यावल्याने सरकारी रुग्णालयातील वैधकीय अधिकार्‍यांनी  उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली  चोरमारे व कोल्हे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. यावेळी कोळेकर म्हणाले की आमच्या शिवाय सत्तेत कोणीही येऊ शकत नाही महाराष्ट्रात तीन ठिकाणी राज्यव्यापी उपोषण चालू आहेत. तरी राज्य सरकार दुर्लक्ष का करते? हा प्रश्‍न धनगर समाजाला पडला आहे. राज्य कर्त्याबरोबरच स्थानिक प्रशासनानेही आमच्या मागण्यांकडे डोळेझाक केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या नेत्यांना व पदाधिकार्‍यांना धनगर समाजाची आठवण येते. इतरवेळी हीच मंडळी आमच्याकडे ढुंकूनही पाहात नाही. आता योग्य  निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. आम्ही योग्य वेळेला चाबूक बाहेर काढुच असा घणाघात यावेळी कोळेकर यांनी केला याप्रसंगी नेवासे तालुका शेतकरी संघटनेचे च्या वतीने पूर्ण ताकतीने जाहीर पाठींबा देण्यात आला असल्याचे तालुका अध्यक्ष मेजर अशोक काळे यांनी सांगितले.

निवडणुकीत नेत्यांना जागा दाखवून देवू – येणार्‍या विधानसभा निवडणुकीत सर्व आमदार, खासदार यांना त्यांची जागा दाखवून देवू उपोषण स्थळी कुठलेही नेते मंडळी आले नाही आमच्या भावना सरकार पर्यत कशा पोहचणार त्यामुळे आता फक्त जलसमाधी हाच एक पर्याय असल्याचे उपोषण कर्ते प्रल्हाद चोरमारे यांनी सांगितले.

उपोषणामुळे जावयाच्या अंत्यविधीला जाणे टाळले – याच उपोषणात बसलेले जालना जिल्ह्यातील भगवान भोजने हे उपोषणामुळे जावयाच्या अंत्यविधी साठी उपस्थित राहू शकले नाही. आपल्या समाजा बद्दल आपुलकी व बांधीलकी दर्शन यावेळी दिसून आले.

COMMENTS