Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचे 100 टक्के प्लेसमेंट

संगमनेर ः अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए या विभागात शिकणार्‍या सर्व 60 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट

हॉटेलमधे मारहाण करणार्‍या चौघांवर गंभीर गुन्हा दाखल
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेला 825 उमेदवारांनी मारली दांडी
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

संगमनेर ः अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए या विभागात शिकणार्‍या सर्व 60 विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी मिळाल्याने शंभर टक्के प्लेसमेंट झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए व्यंकटेश यांनी दिली असून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पगारावर नोकरी मिळणे ही आनंददायी बाब असल्याचे प्रतिपादन विश्‍वस्त सौ शरयूताई देशमुख यांनी केले आहे. अमृत कलामंच येथे अभियांत्रिकी मधील एमबीए विभागातील सर्व 60 विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शरयूताई देशमुख प्राचार्य डॉ.एम.ए वेंकटेश, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ.जे.बी.गुरव, डॉ.वृषाली साबळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. आमदार बाळासाहेब थोरात व मा आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने गुणवत्तेचे विविध मानांकने मिळवली आहेत. विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेच्या ज्ञानाबरोबर कला कौशल्य, माहिती तंत्रज्ञान, व्यक्तिमत्व विकास याकरता स्वतंत्र करिअर डेव्हलपमेंट व ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग कार्यरत आहेत. या अंतर्गत विविध ट्रेनिंग सेशन, व्हॅल्यू डिशनल कोर्सेस, इंडस्ट्री इंटरॅक्शन, फिल्ड व्हिजिट यासारखे विविध उपक्रम राबवले जातात. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्यू आयोजित केले जातात. चालू शैक्षणिक वर्षात 45 पेक्षा अधिक कंपन्यांनी एमबीए साठी कॅम्पस इंटरव्यू घेतला असून यामध्ये 8 लाखापर्यंतचे हायेस्ट पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. सध्या शिकत असलेल्या साठ विद्यार्थ्यांची बजाज फायनान्स, इंडिया मार्ट, मेझॉन ,कोरोझोन होम्स, क्यू स्पायडर, कोणार्क ग्लोबल, एसपीसीएल इन्फोटेक, एचडीएफसी बँक, एस डब्ल्यू एस फायनान्शियल सोल्युशन, अल्पेसा एज्युकेशन ,टीसीएस, डीसीबी बँक, श्रीराम फायनान्स अशा कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यावेळी देशमुख म्हणाल्या की, सध्या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळवणे कठीण झाली असून नोकरी व व्यवसाय करता अत्यंत चांगले मार्गदर्शन महाविद्यालयाच्या माध्यमातून होत असून कॅम्पस इंटरव्यू च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळाली आहे आणि एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे 100% प्लेसमेंट मिळणे या अत्यंत आनंददायी असल्याचेही त्या म्हणाल्या. या विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट साठी प्रा पी.बी. वाकचौरे व डॉ. एस डी खर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS