Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दोन वेगवेगळ्या अपघाता तिघांचा मृत्यू

दोघेजण जखमी ; पारगावावर पुन्हा शोककळा

श्रीगोंदा : मागील काही दिवसांपूर्वी ढवळगाव शिवारात झालेल्या अपघातात पारगाव येथील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतांनाच दोन

प्रहार च्या संघटकपदी तिपायले यांची नियुक्ती
चासनळी व परिसरातील भाविकांची नर्मदा परिक्रमा उत्साहात
प्रशासकांच्या नाकर्तेपणामुळे नगर अर्बन बँकेवर निर्बंध

श्रीगोंदा : मागील काही दिवसांपूर्वी ढवळगाव शिवारात झालेल्या अपघातात पारगाव येथील चार जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतांनाच दोन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास पारगाव येथील तीन तरुण मोटरसायकल वरुन जात असताना पारगाव जवळील महादेव मंदिराजवळील सरस्वती नदीच्या पुलावर त्यांच्या मोटार सायकलचा अपघात होऊन ते पुलावरुन खाली पडले. त्यात गंभीर दुखापत झाल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृततरुण विकास दादासाहेब वाकळे वय 22, गणेश छगन उर्फ छबू वाकळे वय 28, पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर वय 42 रा पारगाव या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे मृत्यूदेह अ‍ॅम्बुलन्स मधून श्रीगोदयाकडे घेऊन जात असताना स्वामी विवेकानंद कॉलेज जवळ याच अ‍ॅम्बुलन्सचा व समोरुन येणार्‍या कारचा भीषण अपघात झाला यात रुग्णवहिकेचा चालक अक्षय गायकवाड आणि मयत व्यक्तीचा पुतण्या हे दोघे गंभीर जखमी झाले असुन दुसर्‍या कारमधील व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून तो कार चालक श्रीगोंदा महसूलमधील तलाठी असल्याचे समजते. जखमींपैकी एकाला नगर व दुसर्‍याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांना या घटनेबाबत माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र या दोन विचित्र अपघातात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS