Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवास्तव व्याज मागितल्याने सावकारावर गुन्हा दाखल

जामखेड : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही अवास्तव व्याजाची मागणी करू लागल्याने व कोरे चेक घेणार्या सावकारावर खर्डा पोलीस स्टेशनला

नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
श्रीरामपूरच्या काँग्रेस शहराध्यक्षाने उद्धव ठाकरेंचा बॅनर झळकावला
आ. आशुतोष काळेंनी सपत्नीक ढोल वाजवत दिला बाप्पाला निरोप

जामखेड : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही अवास्तव व्याजाची मागणी करू लागल्याने व कोरे चेक घेणार्या सावकारावर खर्डा पोलीस स्टेशनला गुरनं 142/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(1)351, 352,(2) 352(3) सह महाराष्ट्र सावकार अधिनियम 2014चे कलम39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाजीराव मोहन बहादूरे रा. तेलंगशी ता जामखेड दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अशोकराव रामहरी सुरवसे रा. धामणगाव ता जामखेड याच्याकडून 3 टक्के व्याजाने 1लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याचे व्याज 40,500/रुपये दिले परंतु यातील सावकार आरोपी अशोक सुरवसे याने 3 ऐवजी 4 टक्के दराने आवास्तव व्याजाचे पैशाचे मागणी सुरू केली. त्यानंतर सावकाराने फिर्यादीकडून घेतलेल्या ब्लँक चेकचा वापर करून त्यावर 1 लाख 35 हजार रुपये अशी रक्कम टाकून यातील फिर्यादीने घराचा हप्ता भरण्यासाठी ठेवलेले पैसे आरोपीने परस्पर काढून घेतले तसेच आणखी अवास्तव व्याजाची मागणी करून छळ करत त्रास देऊ लागला. फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी घाबरून खर्डा पोलीस स्टेशनला धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरून अशोक सुरवसे या सावकारावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनी विजय जंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल पंडित हंबर्डे करीत आहेत. अवैध सावकारकी करणे हे कायद्याने गुन्हा आहे,अवैध सावकारकी करणार्‍यांनी अशा प्रकारे अवैध सावकारकी करून शेतकरी व गरीब लोकांचा छळ होत असेल तर अशा लोकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन सपोनि विजय झंजाड यांनी केले आहे. त्यामुळे खर्डा व परिसरातील अवैध सावकारी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

COMMENTS