Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांग बांधवांसाठी आयोजित रक्षाबंधन उत्साहात

राहुरी ः राजयोग भवन राहुरी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविदयालय च्या संचालिका नंदादीदी यांच्या वतीने दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या राहुरी त

राष्ट्रवादीचा काँग्रेस जामखेड तालुकाध्यक्ष कोण?
माझ्याकडे काय बघतोस, असे म्हणत तरूणाला मारहाण
ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडा- पो. नि. दौलतराव जाधव

राहुरी ः राजयोग भवन राहुरी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍वविदयालय च्या संचालिका नंदादीदी यांच्या वतीने दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या राहुरी तालुक्यातील दिव्यांग बंधुभगिणी प्रती रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाऊ बहिणीच्या नात्यातील मधुरता वाढवणारी प्रसन्न जीवन बनवणारी राखी दिव्यांग परिवारासाठी रक्षाबंधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 यामध्ये योगा मेडिटेशन जीवनात कसे जगले पाहिजे, यावर व्याख्यान करण्यात आले. विश्‍वविद्यालयाच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी मेडिटेशन योगा या विषयावर सात दिवसाचा कोर्स होणार आहे या कोर्ससाठी दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा. सदर प्रसंगी राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या उपस्थित दिव्यांग बंधू-भगिनींना बंधू भावाची प्रतीक तिलक लावून औक्षण करून राखी बांधून, महाप्रसाद देऊन तसेच सर्वांचे आभार प्रदर्शित करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी संस्थापक मधुकर घाडगे दिव्यांगशक्ति सेवा संस्थेचे खजिनदार सलीम शेख राहुरी तालुकाध्यक्ष योगेश लबडे राहुरी तालुका संपर्कप्रमुख रविंद्र भुजाडी राहुरी तालुका सचिव दत्तात्रय खेमनर दिव्यांग सेवा संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव शिंदे, मनोरी शाखा अध्यक्ष कोकाटे, कु.छायाताई साठे सदस्य, विष्णू ठोसर, रविंद्र उदलमुगले, सुखदेव किर्तने बाबा, अरुण पटारे भागवत साळुंके शहराध्यक्ष जुबेर मुसानी अनिल तोडमल मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव उपस्थित होते.

COMMENTS