Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विक्रोळीतील अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबईतील विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असणार्‍या कारचालकाचे गाडीवरून नियंत्

अपघातात कार चालक गंभीर जखमी
विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात
दौंड तालुक्यातील अपघातात दोन महिलांचा मृत्यू

मुंबई ः मुंबईतील विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असणार्‍या कारचालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने फुटपाथवरील झाडाला गाडी जोरदार धडकली व काही अंतरावर जाऊन पलटी झाली. यात दोन जण ठार झाले आहेत. विक्रोळी पूर्व द्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. यात चालक सिद्धार्थ ढगे व त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र रोहित निकम हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.

COMMENTS