Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क पोलिस स्टेशनमध्येच भरवला जुगाराचा अड्डा

नागपुरच्या कळमना ठाण्यातील प्रकार कारवाईची मागणी

नागपूर ः गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यामध्ये चक्क पोलिसांनीच जुगाराचा अड्डा बनवल्याचे समोर आले आह

एकल समितीच्या कामाचा महिला आयोगाने केला गौरव
बिग बॉस महेश मांजरेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.
आर्थिक गुन्हे शाखेकडे आता दहा कोटींच्या पुढची प्रकरणे

नागपूर ः गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यामध्ये चक्क पोलिसांनीच जुगाराचा अड्डा बनवल्याचे समोर आले आहे. एका तक्रारदाराने यासंदर्भातील व्हिडिओ केला असून, त्यानंतर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये एका अधिकार्‍यासह अनेक पोलिस पत्ते खेळतांना दिसून येत आहे. तर पोलिस अधिकारी धुम्रपान करत जुगार खेळतांना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसच जर ठाण्यात जुगार खेळत असतील तर, कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याशिवाय राहणार नाहीत, त्यामुळे या पोलिसांविरोधात कारवाई  करण्याची मागणी जोर धरतांना दिसून येत आहे.
नागपूरच्या कळमना पोलिस चौकीतील हा गंभीर आणि धक्कादायक प्रकार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे. नागपुरातील पोलिस कर्मचार्‍यांचा पत्ता खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका तक्रारदाराने हे व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती मिळत आहे. नागपूरच्या कळमना पोलिस चौकीमधील व्हिडिओत काही पोलिस कर्मचारी पोलिस चौकीत जुगार खेळताना दिसत आहेत. वर्दीवर असलेले हे पोलिस कर्मचारी धूम्रपान करताना दिसत आहेत. चक्क पोलिस चौकीत हे कर्मचारी उघडपणे जुगार खेळतानाचा व्हिडिओमुळे नेटकरी आश्‍चर्य व्यक्त करत आहेत. नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा असते.. पोलिस कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळून नागरिकांना सुरक्षित वातावरण देतील अशी अपेक्षा असताना पोलिसच पोलिस चौकीत बसून जुगार खेळायला लागले, तर कायदा सुव्यवस्थेचा काय होणार असा प्रश्‍न या व्हिडिओ समोर आल्यानंतर निर्माण झाला आहे.

COMMENTS