Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एपीआय आव्हाड यांची चौकशी सुरू

श्रीरामपूर ः एका महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथून संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक व टेम्पो मोठी आर्थिक तडजोड करुन सोडून दिल्या प्रकरणी सहा

साई खेमानंद फाउंडेशन च्या माध्यमातुन बेलापूर ला तातडीने कोविड सेंटर चालू करावे : प्रफुल्ल डावरे
छमछमला उस्थळ दुमाला गावातून एकमुखी विरोध !
मंत्रालयात नोकरी लावण्याचे सांगत पाच लाखांची फसवणूक

श्रीरामपूर ः एका महिन्यापूर्वी श्रीरामपूर येथून संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक व टेम्पो मोठी आर्थिक तडजोड करुन सोडून दिल्या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड व त्यांचे रायटर ज्ञानेश्‍वर वाघमोडे यांचेविरुध्द पोलिस महासंचालकांकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस उपाधीक्षक बसवराज शिवपुजे यांनी चौकशी सुरु केल्याची माहिती तक्रारदार भाजपचे नेते सुनील मुथा यांनी दिली आहे.                                            
याबाबतचा सविस्तर तपशील असा की, शनिवार 13 जुलै रोजी रात्री संशयास्पद तांब्याच्या तारा घेवून जाणारा ट्रक व टेम्पोबाबतची खबर ए.पी.आय.सुरेश आव्हाड यांना मिळाली.सदरची खबर मिळताच श्री.आव्हाड व त्यांचे रायटर वाघमोडे यांनी बेलापूर येथिल नगर बायपासला राञी सदरची वाहने पकडून बेलापूर पोलिस चौकीत आणली. यानंतर श्रीरामपूर येथील वार्ड नं.2 मधील काही व्यक्ती तेथे आल्या.त्यांनी आव्हाड यांच्याशी आर्थिक तडजोड केली. त्यानंतर दोन्ही वाहने सोडून देण्यात आली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सदर सीसीटीव्ही फुटेज मिळण्यासाठी चा अर्ज विहित वेळेत देऊनही पोलिसांकडून आज पावेतो फुटेज आपणास मिळालेले नसल्याचे ही तक्रारदार मुथा यांनी म्हटले आहे. सदर तडजोडीचा प्रकार गंभीर व पोलिस यंत्रणेला काळीमा फासणारा असल्याने आपण याबाबत पोलिस महासंचालक यांचेसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. त्याची गांभिर्याने दखल घेवून पोलिस उपाधीक्षक शिवपुजे यांनी याप्रकरणी चौकशी ठेवली असून चौकशीकामी उपस्थित राहणेबाबत आपणास लेखी कळविल्याचे मुथा यांनी सांगीतले. बहुचर्चित अशा या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS