Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेत्र पिढीच्या स्थापनेमुळे नेत्रदान चळवळीला गती मिळेल ः डॉ. सुधा कांकरिया

आनंदऋषीजी नेत्रालयात मोफत नेत्र तपासणी; शिबिरास ज्येष्ठांचा प्रतिसाद

अहमदनगर ः राष्ट्रसंत प.पू. आनंदऋषीजी महाराजांचे स्वप्न आदर्शऋषीजींच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. या

ओबीसी आरक्षणासाठी समताचा एल्गार ; नगरला रस्ता रोको आंदोलनात झाली निदर्शने
एकच व्यक्ती पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह ; कोरोना तपासणीचा सावळा गोंधळ
पाथर्डी नगरपालिकेच्या शहर पथविक्रेता समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसची मुसंडी

अहमदनगर ः राष्ट्रसंत प.पू. आनंदऋषीजी महाराजांचे स्वप्न आदर्शऋषीजींच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवेची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. अंधारलेल्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचे कार्य नेत्र विभाग करत आहे. अंधांची वाढती संख्या व नेत्रदान यामध्ये मोठी विषमता असून, अंधांमध्ये 60 टक्के लहान मुले आहेत. नेत्रदान होत नसल्याने, ते नेत्राच्या प्रतिक्षेत आहेत. नेत्रदान चळवळीला गती देण्यासाठी आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पिढीची स्थापना केली जाणार आहे. यामुळे नेत्रदान चळवळीला गती मिळून अनेक अंधाचे जीवनात प्रकाश निर्माण होणार असल्याची भावना डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त साई सूर्य नेत्र सेवा व कांकरिया परिवाराच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. कांकरिया बोलत होत्या. यावेळी डॉ. प्रकाश कांकरिया, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे, सचिव सुभाष गर्जे, रमेश छाजेड, रत्नप्रभा छाजेड, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, माणकचंद कटारिया, सुभाष मुनोत, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, नेत्रालय विभागाचे प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, नेत्र विभागातील तज्ञ डॉ. अशोक महाडिक, डॉ. संदीप राणे, डॉ. प्रतीक कटारिया आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलचे नेत्र विभाग तीन जिल्ह्यांना आरोग्य सेवा पुरवित आहे. तज्ञ डॉक्टर, अनुभवी स्टाफ व अद्यावत यंत्र सामुग्रीने दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे कार्य सुरु आहे. मोतीबिंदू व इतर डोळ्यासंबंधी 85 हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. 156 लोकांचा टीम या सेवा कार्यात योगदान देत आहे. डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, पुढील वर्षी हॉस्पिटलच्या स्थापनेचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा होणार आहे. यानिमित्ताने आनंदऋषीजी नेत्रालय विभागात नेत्र पेढी कार्यान्वीत केली जाणार आहे. या शिबीरात 641 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन तज्ञ डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केले. गरजूंवर सवलतीच्या दरात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केला जाणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. 

COMMENTS