Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाट्य निर्मात्याची फसवणूक प्रकरण; मनोज जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द

पुणे / प्रतिनिधी : पुण्यातील धनंजय घोरपडे या नाट्य निर्मात्याची मनोज जरांगे पाटील यांच्यासह दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला

मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात
आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार
मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाची नोटीस

पुणे / प्रतिनिधी : पुण्यातील धनंजय घोरपडे या नाट्य निर्मात्याची मनोज जरांगे पाटील यांच्यासह दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना दोनवेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने बजावले होते. पण मनोज जरांगे पाटील हे आंदोलन आणि वैद्यकीय कारणास्तव कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी आरोपीचे वकील आणि फिर्यादी यांच्या वकीलामध्ये जवळपास तासभर युक्तीवाद झाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा तीन हजार रुपयांच्या बॉन्डवर अटक वॉरंट रद्द करत पुढील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे न्यायाधीश एस.बिराजदार यांनी सांगितले.

संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील हे उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचे सांगितले आहे. त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. या कारणास्तव न्यायालयाचा अटक वॉरंटचा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती जरांगे पाटील यांच्या वकिलांनी केली.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी समाज माध्यमांद्वारे कोर्टाच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब फिर्यादीच्या वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि न्यायालयाचा अवमान होईल, अशी टिप्पणी प्रत्येकाने टाळावी. त्यामुळे न्यायालयाच्या अवमान कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, अशा शब्दात न्यायाधीश एस. बिराजदार यांनी मनोज जरांगे पाटील यांना समज दिली.

COMMENTS