Homeताज्या बातम्यादेश

देश लोटस चक्रव्युहात अडकला

खा. राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः देशामध्ये सध्या नवा चक्रव्यूह आला असून जो कमळाच्या अर्थात लोटसच्या आकाराचा आहे. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकविले होते, त्याच चक्र

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली
Rahul Gandhi : मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच (Video)
राहुल गांधींना दिलासा नाहीच

नवी दिल्ली ः देशामध्ये सध्या नवा चक्रव्यूह आला असून जो कमळाच्या अर्थात लोटसच्या आकाराचा आहे. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकविले होते, त्याच चक्रव्यूव्हात देशातील सर्वसामान्य लोकांना अडकविले जात आहे. देशातील तरुण, शेतकरी, माता भगिनी आणि छोटे-मोठे व्यापार्‍यांना या चक्रव्यूव्हात अडकविण्याचे काम पंतप्रधानांच्या छातीवरील चिन्ह करत आहे. पण इंडिया आघाडीवाल्यांना चक्रव्यूह कसे भेदायचे हे चांगले कळते, लोकसभा निवडणुकांत तो आम्ही भेदून दाखवला आहे, अशी जोरदार हल्लाबोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेसाठी काहीही नाही. दोन ते तीन टक्के लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच सरकारने मध्यम वर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याची शक्ती कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशातील शेतकर्‍यांना मदत केली जाईल, तरुणांना मदत केली जाईल. देशातील कामगार, छोट्या उद्योजकांची मदत केली जाईल. मात्र या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून एकाधिकारशाहीच्या सूत्राला आणखी मजबूत करण्यात आले. एकाधिकारशाहीमुळे लोकशाही मूल्यांना नेस्तनाबूत केले. उद्योगातील एकाधिकारशाहीमुळे देशातील लघु, शूक्ष्म उद्योगांना फटका बसला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. सध्या देशात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. ही स्थिती सध्या सर्वदूर आहे, सध्या एकविसाव्या शतकात देशात नव्या प्रकारचे चक्रव्यूह आहे. चक्रव्यूहाला पद्मव्यूह म्हटले जाते. ज्या प्रकारे अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये फसवण्यात आले होते. त्याच पद्धतीने आता भारतीय जनतेतील नागरिकांना फसवण्यात आलं आहे.  सध्या देशातील युवक, शेतकरी, महिला, लघु आणि शूक्ष्म उद्योग चक्रव्यूहात फसले आहेत. महाभारतातील चक्रव्यूह सहा जण कंट्रोल करत होते. आताही नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदाणी या सहा जाणांकडून चक्रव्यूहाला कंट्रोल केले जात आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात शिक्षण, पेपरफुटीवर कोणतेही भाष्य केलेले नाही. शिक्षणासाठी सर्वांत कमी आर्थिक तरतूद करण्यात आली. टॅक्स टेरिरिझम रोखण्यासाठी सरकारने काहीही केलेले नाही. सरकारने मध्यमवर्गाच्या पाठीत आणि छातीत सुरा खुपसला आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

दलित, आदिवासींना कुठेही स्थान नाही – देशातील सुमारे 73 टक्के दलित आदिवासी आणि मागासलेले आहेत. हीच देशाची खरी ताकद आहे. त्यांना कुठेही जागा मिळत नाही हेच सत्य आहे. त्यांना सरकारमध्ये स्थान मिळत नसल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केली. शिक्षणाच्या बजेटमध्ये गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच खूप कमी निधी दिला गेला. जो की केवळ 2.5 टक्के इतका आहे. शेतकर्‍यांना चक्रव्युहातून बाहेर काढणयासाठी एमएसपीची लीगल गॅरंटी मागण्यात आली आहे. मला शेतकर्‍यांना भेटण्यापासून रोखण्यात आले असा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला.

आम्ही चक्रव्यूह तोडण्याचे काम करतो – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सदनात अंबानी आणि अदाणी यांचे नाव घेण्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मनाई केली आहे. राहुल गांधीनी मोदी-शाह यांच्यासह अंबानी-अदाणी हे चक्रव्यूह चालवतात, असे म्हटल्यानंतर सत्ताधार्‍यांनी गदारोळ केला. मात्र कितीही कितीही गदारोळ केला तरीही शांत बसणार नाही, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. मोदी, शाह, अंबानी आणि अदाणी हे 21 व्या शतकात नवे चक्रव्यूह चालवतात. चक्रव्यूहात भीती आणि हिंसा असते. चक्रव्यूह कमळाच्या आकाराचा असतो. आम्ही चक्रव्यूह तोडण्याचे काम करतो, असे राहुल गांधी म्हणाले.

COMMENTS