Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन

बीड प्रतिनिधी - सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय

पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करा : अजित पवार
महायुतीसह अनेक पक्षांचा उमेदवारांना ‘दे धक्का’!
भाजपकडून मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न ः खा. रजनी पाटील

बीड प्रतिनिधी – सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालय भारत सरकार मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्र. 14567 सर्व राज्यात सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने महाराष्ट्रातही ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन एल्डर लाईन 14567 चालवले जाते.
 जेष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे अत्याचारग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे तसेच इतर सेवांसाठी ही हेल्पलाइन उपयोगी ठरणार आहे. हेल्पलाइन टोल फ्री असून हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. हेल्पलाइन केवळ 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर व 1 मे वगळता सर्व दिवस सुरू राहणार आहे.  हेल्पलाइनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केले असून हेल्पलाइनमार्फत आरोग्य, उपचार, निवारा, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, जेष्ठासंबंधित अनुकूल उत्पादन तसेच सांस्कृतिक, अध्यात्मिक, कला व करमणूक इत्यादींबाबत माहिती दिली जाते. यात कायदेविषयक मार्गदर्शन, विवाद निराकरण, पेन्शन संबंधित मार्गदर्शन शासकीय योजनांची माहिती पुरविली जाते. क्षेत्रीय पातळीवर बेघर अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी हेल्पलाइन कार्यरत आहे तरी गरजू जेष्ठ यांनी मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्यणचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे

COMMENTS