Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटणमध्ये पोलिसांचा छापा; 9 लाखाचे दिड टन गोमांसह हस्तगत

शहरातील कुरेशी मोहोला मंगळवार पेठ फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दिड टन म्हणजेच 1500 किलो जनावराचे गोमांस दोन फॉर्व्हिलर ताब्यात घेत सात जणांविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे

टंचाईचे ढग दाटले; लातूर जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणी आता पिण्यासाठी आरक्षित !
अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू
आरोग्य विभागाच्या परीक्षाप्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी : राजेश टोपे

 फलटण /प्रतिनिधी : शहरातील कुरेशी मोहोला मंगळवार पेठ फलटण येथे फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून तब्बल 9 लाख 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत दिड टन म्हणजेच 1500 किलो जनावराचे गोमांस दोन फॉर्व्हिलर ताब्यात घेत सात जणांविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 3 मे रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास कुरेशी मोहल्ला मंगळवार पेठ फलटण इसम नामे इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांचे पाच साथीदार यांनी बिनपरावना बेकायदेशीरपणे जनावरांची कत्तल करत असताना 1500 किलो गोमांस व कत्तल करण्यासाठी आणलेले जिवंत जनावरे व गोमांस वाहतूक करण्यासाठी लागणार्‍या वाहनासह त्यामध्ये एक बिगर नंबर महिंद्रा पिकप, मारुती 800, एक मोटर सायकल, असा मुद्देमाल याप्रमाणे जप्त आहे एकूण किंमत रुपये 9,10,000/- मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नवनाथ गायकवाड, सपोनि सचिन राऊळ, सहा. फौजदार भोईटे, पोलीस हवालदार भैया ठाकूर, पो. ना. नितिन चतुरे, पो. ना. सर्जेराव सूळ, पो. ना. लावंड, पो. ना. भोसले, पो. ना. वाडकर, पो. कॉ. बडे, पो. कॉ. लोलपोड यांनी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम हे करत आहेत.

COMMENTS