Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! अल्पवयीन मुलाने घेतला गळफास

जामखेड शहरातील बोराटे वस्तीवरील घटना

जामखेड ः जामखेड शहरातील बोराटे वस्ती येथील शिवम ज्ञानेश्‍वर बोराटे वय 15 वर्षे, या नववीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन

स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या
डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या

जामखेड ः जामखेड शहरातील बोराटे वस्ती येथील शिवम ज्ञानेश्‍वर बोराटे वय 15 वर्षे, या नववीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नसुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड शहरातील बोराटे वस्ती येथील शिवम ज्ञानेश्‍वर बोराटे, वय 15 वर्षे, हा नुकताच आठवी मधून इयत्ता नववी मध्ये गेला होता. 25 जून रोजी सकाळी तो आपल्या किराणा दुकानात बसला होता. यानंतर शाळेची वेळ झाल्याने त्याची आई घरातून दुकानात आली व त्याला शाळेत जाण्यासाठी तयारी कर असे म्हणुन घरी जाण्यास सांगितले. या नंतर तो दुसर्‍या मजल्यावरील आपल्या घरी गेला. शिवम याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS