भाळवणी ः पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात बुधवारी दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमा
भाळवणी ः पारनेर तालुक्यातील भाळवणी व परिसरातील अनेक गावात बुधवारी दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता. उन्हाच्या काहिलीने लोक त्रस्त झाले होते. दुपारच्या सुमारास जामगाव, वडगाव आमली, दैठणे गुंजाळ, भांडगाव सह अनेक गावात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. या पावसामुळे भाळवणीच्या आठवडे बाजारात व्यापारी व बाजारकरू यांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
COMMENTS