Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड तालुक्यात 74 कोटी 65 लाख पीक कर्ज वाटप ः अमोल राळेभात

जामखेड ः अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यातील सलंग्न  प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या 9 हजार 127 नियमित कर्जदार सभासदांकडू

कुपोषित बालकांसाठी टास्क फोर्स तयार करा
सिटी केअर हॉस्पिटलमध्ये जीवघेणा हल्ला.. | ब्रेकिंग | LokNews24 |
बंधार्‍यावरून लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद

जामखेड ः अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जामखेड तालुक्यातील सलंग्न  प्राथमिक सेवा सहकारी संस्थेच्या 9 हजार 127 नियमित कर्जदार सभासदांकडून माहे मार्च 2024 अखेर 85 कोटी 18 लाख 50 हजार 495 इतका वसुल झाला असून या सभासदांना बँकेच्या धोरणाप्रमाणे नुतनीकरण प्रस्तावास मंजुरी देवून कर्ज वितरण झाले असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी दिली.
पीक कर्ज भरणा केलेल्या सभासदांना वेळेवर पीककर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी  5 एप्रिल 2024 रोजी तालुक्यातील सहकारी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ,संस्था सचिव व बँक अधिकारी यांची सयुंक्त मिटिंग घेवून बँक कर्मचारी व सचिव यांना जादा वेळ बसून काम करण्यास सांगून कर्ज वितरण लवकरात लवकर होणे संदर्भात सूचना दिल्या होत्या.त्यानुसार अमोल राळेभात यांनी 26 एप्रिल 2024 रोजी तालुका विकास अधिकारी,वसुली अधिकारी,ओएस यांची संयुक्त मिटिंग घेवून पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला असता तालुक्यातील 43 संस्थेच्या 8821 सभासदांच्या रूपे केसीसी खात्यावर रक्कम रु. 74 कोटी 65 लाख 27 हजार 150 इतकी रक्कम जमा झाली असल्याचे तसेच उर्वरित 5 संस्थेच्या 306 सभासदांचे कर्ज वितरण पेंडिंग असल्याची माहिती तालुका विकास अधिकारी यांनी सयुंक्त सभेमध्ये मे.संचालक साहेब यांना दिली. घोडेगाव संस्था रु. 3161871/- ने अनिष्ट तफावतीत असून संस्थेचा तोटा रु. 5901082/- झालेला आहे.पाटोदा विका संस्था 32162036/- ने अनिष्ट तफावतीमध्ये असून संस्थेचा तोटा रक्कम रु. 33880336/- इतका झालेला आहे.धनेगाव संस्थेची अनिष्ट तफावत रु. 2260805/- असून तोटा रु. 10917440/- इतका आहे.किसान क्रांती विका संस्था 340152/- ने तोटयात आहे.तसेच जातेगाव संस्था रु. 2308768/- ने अनिष्ट तफावतीत असून संस्थेचा तोटा रु. 4071959/- झालेला आहे. या सर्व संस्थांची बाहेरून कर्ज उभारण्याची मर्यादा संपुष्टात आली होती. त्यामुळे संस्थेची बाहेरून कर्ज उभारण्याची मर्यादा मे.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड यांच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करून त्यांची मर्यादा वाढवलेबाबतचे मंजुरी पत्र घेणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे वरील संस्थांचे प्रस्ताव शाखेत उशिरा दाखल होवूनही सर्व संस्थाचे प्रस्ताव 24 एप्रिल 2024 अखेर मंजुर झालेले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक हे तालुक्याचे प्रतिनिधी असताना तसेच तालुक्यातील कामकाजावर संचालकाचे पूर्ण नियंत्रण असताना आणि दि 26 एप्रिल 2024 अखेर 9127 पैकी 8821 सभासदांचे कर्ज वितरण पूर्ण झाले असताना काही पक्षाचे व संस्थेचे पदाधिकारी जाणीवपूर्वक राजकीय हेतूने, बँकेची बदनामी करणे हा एकच उद्देश डोळ्यसमोर ठेवून नगरमध्ये हेड ऑफिसला जावून राजकीय स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात हि जामखेड तालुकाच्या दृष्टीने खेदाची बाब असल्याचे परखड मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल जगन्नाथ राळेभात यांनी व्यक्त केले.

COMMENTS