Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरगुती गॅस ग्राहकांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावे

कोपरगाव तालुक्यातील गॅस एजन्सी चालकाकडून आवाहन

कोपरगाव शहर ः केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शन चे ई-केवायसी केलेले नाही. त्यांनी त्वरीत आपल्या

कोल्हे यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून माझ्याकडे अर्ज दिला-नगराध्यक्ष वहाडणे
केडगाव मधील साथीच्या आजारांवर उपाय योजना सुरू करा – नगरसेवक मनोज कोतकर
श्री क्षेत्र निंबे येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ

कोपरगाव शहर ः केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार ज्या गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस कनेक्शन चे ई-केवायसी केलेले नाही. त्यांनी त्वरीत आपल्या जवळच्या गॅस वितराकाकडून आपल्या गॅस कनेक्शनचे बायोमेट्रिक म्हणजेच ई-केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन कोपरगाव तालुक्यातील एच पी गॅस पुरवठा करणार्‍या अधिकृत गॅस एजन्सी चालकाडुन करण्यात आले आहे.
गॅस कनेक्शन बायोमेट्रिक म्हणजेच ई-केवायसी न झालेल्या गॅस ग्राहकांना केंद्र सरकारकडून मिळणार्‍या सर्व सरकारी गॅस सुविधा बंद होऊ शकतात? त्यामुळे त्वरीत सर्व गॅस ग्राहकांनी आपल्या गॅस एजन्सी मध्ये गॅस पुस्तक व गॅस नावावर असलेल्याचे आधारकार्ड व आधारकार्ड ला लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन जात अवघ्या काही मिनिटांमध्ये आपल्या घरगुती गॅस कनेक्शन चे  प्रमाणिकरण म्हणजेच ई-केवायसी संपूर्णपणे निःशुल्क म्हणजेच विनामूल्य करून घ्यावे. तसेच प्रत्येक घरगुती गॅस ग्राहकाने सिलेंडर डिलिव्हरी घेताना डिलिव्हरी प्रतिनिधींकडून आपल्या गॅस कनेक्शनची विनामूल्य सुरक्षा तपासणी करून देण्याचा आग्रह करावा. त्यामध्ये आपल्या सुरक्षा पाइप ची मुदत तपासली जाईल व कालबाह्य झालेले गॅस पाइप त्वरीत बदलले जातील.

निशुल्क केवायसी – कोपरगाव तालुक्यात एचपी गॅसचा अधिकृत पुरवठा करणारे कोपरगांव गॅस कंपनी येवला नका कोपरगाव, गुरुराज गॅस एजन्सी गौतम बँक जवळ औद्योगिक वसाहत व श्रीकृष्ण गॅस एजन्सी संवत्सर या एजन्सी असून ग्राहकांनी ज्या एच पी गॅस एजन्सी कडून घरगुती गॅस खरेदी केला आहे तिथे जाऊन आपल्या गॅस कनेक्शन चे निशुल्क ई-केवायसी करून घ्यावे.

COMMENTS