Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू

अकोला/प्रतिनिधी ः अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस गावात रविवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. पावसामुळे मंदिरवरील पत्र्याच्या शेडवर जुने

पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री फडणवीस
जालन्यात मराठा आंदोलन चिघळलं
करदात्यांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला/प्रतिनिधी ः अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील पारस गावात रविवारी संध्याकाळी भीषण दुर्घटना घडली. पावसामुळे मंदिरवरील पत्र्याच्या शेडवर जुने झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला तर सुमारे 40 जण जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी ही माहिती दिली आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पारस गावात बाबाजी महाराज मंदिरासमोर रविवारी संध्याकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. यावेळी अचानक वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने कडुलिंबाचे झाड पत्र्याच्या शेडवर कोसळले. या शेडखाली अनेक भाविक उभे होते. त्यातील अनेक जण त्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, सुमारे 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर अकोला मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही अवकाळीने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी वीज कोसळल्याचे वृत्त आहे. परभणीत वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जनावरेही दगावली आहेत. परभणीच्या मानवत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

मुख्यमंत्र्यांनी केली चार लाखाची मदत जाहीर – अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या दुर्घटनेत 7 भाविक ठार तर 23 जण जखमी झाले आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

COMMENTS