Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझ्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा नाही

खासदार श्रीकांत शिंदेंच्या विधानाने संभ्रम कायम

मुंबई ः काही दिवसांपूर्वीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवेसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढतील अशी घोष

टीडीएम’ या सिनेमाला शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत.
हळदी समारंभासाठी रस्ता अडवला, नवरदेवावर गुन्हा
शासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा; गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोलीस विभागाला सूचना

मुंबई ः काही दिवसांपूर्वीच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवेसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढतील अशी घोषणा केली होती. मात्र श्रीकांत शिंदे ज्या पक्षाकडून लढणार आहेत, त्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर केलेली नाही. यासंदर्भात बोलतांना श्रीकांत शिंदे म्हणाले की, माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल असे विधान शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणच्या उमेदवारीवरून केले आहे. त्यांच्या या विधानाने आता पुन्हा एकदा कल्याणच्या उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला आहे.
कल्याणच्या उमेदवारीबाबत बोलतांना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी माझ्या उमेदवारीची घोषणी केली होती, त्याचे मी स्वागत करतो. मात्र, त्यांनी घोषणा केली असली, तरी माझ्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकृतरीत्या घोषणा केलेली नाही. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा पक्ष एका व्यक्तीपूरता मर्यादित नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. श्रीकांत शिंदे यांच्या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा आहे. या मेळाव्याआधी श्रीकांत शिंदे यांनी महायुतीमध्ये मनसेच्या सहभागा संदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. मला वाटते हा वरिष्ठांच्या चर्चेचा विषय आहे. याबाबत मी जास्त भाष्य करू शकत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वत: राज ठाकरे यांच्याशी बोलतील. ते महायुतीमध्ये आले, तर आनंदच आहे. एकविचारी, समविचारी पक्ष एकत्र आले तर लोक भरुभरन मतदान करतील. अजून चांगली काम होतील, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

COMMENTS