Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात

इस्लामपूर / प्रतिनिधी : 18 वी आंतर जिल्हा राष्ट्रीय ज्युनिअर मैदानी स्पर्धा दि. 12 ते 14 जानेवारी 2023 रोजी पटना (बिहार) येथे होणार आहेत. या स्

गुंगीचे औषध घालून महाविद्यालयीन तरुणीवर कब्बडीपटूचा बलात्कार
वाढे विकास सोसायटीच्या सचिवाकडून 60 लाखाचा अपहार
वाळवा महिला राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारचा निषेध

इस्लामपूर / प्रतिनिधी : 18 वी आंतर जिल्हा राष्ट्रीय ज्युनिअर मैदानी स्पर्धा दि. 12 ते 14 जानेवारी 2023 रोजी पटना (बिहार) येथे होणार आहेत. या स्पर्धेत सांगली जिल्ह्याचा संघ सहभाग घेणार असून त्यासाठी सांगली जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन व विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कूल, राजारामनगर, साखराळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 11 डिसेंबर 2022 रोजी राजारामबापू पाटील क्रीडा संकूल येथे जिल्हा मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कूलचे उपप्राचार्य अजित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आहे. या कार्यक्रमाला संघटनेचे सचिव संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापू समलेवाले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते युवराज खटके, विजयकुमार शिंदे, डॉ. गणेश सिंहासने, बी. व्ही. कोकरे, विकास ताटे उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील 14 व 16 वर्षाखालील मुले-मुली असे एकूण 200 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. पाहुण्यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना खेळाडूंनी आपला खेळ जपून स्वतःचे करीअर घडविण्यासाठी अहोरात्र कष्ट करून राज्य व राष्ट्रीय पातळीवर अतिउच्च कामगिरी करावी. तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे नावलौकीक करावे. यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंकुश कलगुटगी, अशिष घोलप, विकास सुर्यवंशी, हेमंत कामटे, उदय गायकवाड, संदिप शिंदे, हिम्मत शिंदे व विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कूल, साखराळेतील खेळाडू व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले व कासेगांव एज्युकेशन सोसायटीचे बहुमोल सहकार्य लाभले.

COMMENTS