हिंदूचा झाला मुस्लिम… मग सुरु केले धर्मांतरणाचे रॅकेट… युपी एटीएसने घेतले ताब्यात…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदूचा झाला मुस्लिम… मग सुरु केले धर्मांतरणाचे रॅकेट… युपी एटीएसने घेतले ताब्यात…

प्रतिनिधी : नाशिक नाशिक रोड परिसरातील आनंदनगरमधून कुणाल चौधरी उर्फ आतिफ याला उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी ताब्यात घेतले. तो वैद्यकीय शिक्षण घेण्या

भीम आर्मी आक्रमक… आमरण उपोषणाला सुरुवात
मंथन परीक्षेत नागवडे इंग्रजी माध्यमांचा डंका
देशातील नर्सिंग अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात येणार आहेत

प्रतिनिधी : नाशिक

नाशिक रोड परिसरातील आनंदनगरमधून कुणाल चौधरी उर्फ आतिफ याला उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी ताब्यात घेतले. तो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी रशियात गेला होता. 

त्यावेळी कट्टरपंथी लोकांच्या संपर्कात आला. हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म त्याने स्वीकारला. नाशिकमध्ये आल्यानंतर त्याने क्लिनिक सुरु केले. 

विदेशात मेडिकल सायन्सची पदवी घेतलेल्या उमेदवारास एम. सी. ए. परीक्षा द्यावी लागते. त्यात तो नापास झाला होता. त्याने अनधिकृत प्रॅक्टिस सुरू केली होती. 

ते क्लिनिक अधिकृत नसले तरी त्याचा व्यवसाय सुरु झाला. त्याठिकाणी येणाऱ्या लोकांना तो हिंदू धर्माविरुद्ध अनेक गोष्टी सांगत असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. 

तसेच परदेशातून वेगवेगळ्या खात्यांतून तब्बल २० कोटी रुपये त्याच्या खात्यात आल्याची माहिती आहे. कुणालने जरी धर्मांतर केले असले तरी त्याच्या परिवाराने मात्र धर्मांतर केले नाही. त्याचे आई-वडील व इतर परिवार हा नाशिकमध्येच असल्याचे सांगण्यात येत आहे.

नोएडा परिसरातील अनेक हिंदू कुटुंबियांचे जबरदस्तीने धर्मांतरण केले जात असल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने उघडकीस आणले होते. या प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीत कुणाल उर्फ आतिफचे नाव समोर आलेे.

दोन वर्षापासून संशयित कलीम सिद्दीकीच्या संपर्कात होता. धर्मांतरासाठी आतिफ शारीरिक व्यंग असलेले आणि मूक बधिर अपंगत्व असलेल्या युवकांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करत होता. त्याने किती जणांचे धर्मांतर घडवून आणले, ही माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कथित अवैध धर्मांतरण प्रकरणाची पाळेमुळे नाशिकपर्यंत (nashik)पोहचली. उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (UP-ATS) रविवारी रात्री नाशिकमधील 

कुणाल चौधरी उर्फ आतिफ याच्यासह मोहम्मद हाफिज इदरीस व मोहम्मद सलीम यांनी एटीएसने ताब्यात घेतले. कुणालच्या अटकेमुळे नाशिक शहरात धर्मांतराची चर्चा सुरु झाली.

COMMENTS