स्फोटकप्रकरणी वाझे करणार होता दोन हत्या ; एनआयएच्या तपासात उलगडले रहस्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्फोटकप्रकरणी वाझे करणार होता दोन हत्या ; एनआयएच्या तपासात उलगडले रहस्य

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी तपास करणार्‍या एनआयएने निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या मोठ्या कटाचा उलगडा केला आहे.

निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन
इस्लामपूर नगरपालिकेची चौथी सभाही तहकूब
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

मुंबई/प्रतिनिधीः उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी तपास करणार्‍या एनआयएने निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या मोठ्या कटाचा उलगडा केला आहे. एनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या वाहन प्रकरणी दोघांची हत्या करून त्यांना या प्रकरणात गोवण्याची शक्यता होती. 

वाझे यांच्या निवासस्थानी एक पासपोर्ट सापडला असून हा या प्रकरणातील महत्वाचा पुरावा ठरू शकतो. एनआयए सध्या या प्रकरणात एन्काऊंटरचा काही प्लॅन होता का, याची माहिती घेत आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाझेकडे एक पासपोर्ट सापडला आहे. त्याच्यासह आणखी एका व्यक्तीची हत्या करण्याचा कट आखला होता. यानंतर अंबीनींच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणात त्यांना गुंतवले जाणार होते. 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले. एनआयएने ओळख उघड करण्यास नकार दिलेल्या त्या दोन व्यक्तींची त्याच दिवशी हत्या केली जाणार होती. नंतर वाझे या प्रकरणाचा उलगडा केल्याचे श्रेय घेणार होता. 17 मार्चला वाझेच्या घरावर धाड टाकली असता हा पासपोर्ट मिळाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्या दोन व्यक्ती औरंगाबाद येथून चोरण्यात आलेली मारूती  एशले कार चालवणार होते आणि स्फोटकांसह अंबानींच्या घराबाहेर पार्क करणार होते. एनआयएने मिठी नदीतून गाडीची नंबरप्लेट मिळवली आहे; पण वाझेला नशिबाने साथ दिली नाही आणि ही योजना फसली. यानंतर त्यांनी बी प्लॅन वापरला ज्यामध्ये मनसुख हिरेन यांच्या मालकीचे वाहन तिथे पार्क करण्यात आले. हिरेन यांच्या हत्येची माहितीही वाझे एटीएससमोर देणार असल्याचे सांगण्यात आले होते. वाझे एन्काऊंटर स्पेशलिस्ट असतानाही योजना अत्यंत वाईट पद्धतीने आखण्यात आल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, अद्यापही हिरेन यांचा गळा नेमका कोणी दाबला हे स्पष्ट झालेले नाही. वाझे याने अटकेच्या एक दिवस आधी वापरलेला फोन अद्यापही तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. फोन होत लागल्यास अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS