शेतकर्यांसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्र येवून काम करावे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्यांसाठी कृषि विद्यापीठ, कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्र येवून काम करावे- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

देवळाली प्रवरा प्रतिनिधी  शेतकर्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठात काम करणारा प्रत्येक शास्त्रज्ञ अविरत प्रयत्न करत आहे. एक वाण तयार करण

नगर शहराच्या आमदारांचं नीच राजकारण…. फलक लावत निषेध
सादिकच्या मृत्यूचे गूढ वाढले…वरिष्ठांना पाठवला अहवाल ; मुकुंदनगर परिसरात बंदोबस्त वाढवला, चौकशी अहवालाची प्रतीक्षा
राष्ट्रवादीचा सरपंच चंदन तस्करांच्या टोळीत सक्रिय… पोलिसांची कारवाई


देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

शेतकर्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि विद्यापीठात काम करणारा प्रत्येक शास्त्रज्ञ अविरत प्रयत्न करत आहे. एक वाण तयार करण्यासाठी दोन-तीन वर्षाचा कालावधी लागतो. विद्यापीठाने आत्तापर्यंत प्रत्येक पिकात विक्रमी उत्पादन देणारे वाण विकसीत केलेले आहेत. झालेले संशोधन विद्यापीठाच्या विस्तार यंत्रणेेमार्फत आणि कृषि विभागाच्या विस्तार यंत्रणेमार्फत शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन विक्रमी संख्येने करत असते. कमी मनुष्यबळ व पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना संशोधन करतांना अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही प्रत्येक पिकात जास्त उत्पादन देणारे वाण विकसीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. शेतकर्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे हे आपल्या सर्वांचे उद्ष्टि असून ते साध्य करण्यासाठी कृषि विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व महाबीज यांनी एकत्रीतपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे  कुलगरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त श्री. धीरज कुमार प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण श्री. दिलीप झेंडे,  कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, कृषि परिषदेचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. विठ्ठल शिर्के, महाबीज, अकोलाचे संचालक श्री. फुंडकर, श्री. आर.सी. जोशी उपस्थित होते. कृषि आयुक्त श्री. धीरज कुमार म्हणाले शेतातील सर्व प्रकारची कामे एकाच यंत्राने करता येतील अशा प्रकारचे यंत्र तयार करण्यासाठी विद्यापीठाने संशोधन करावे जेणेकरुन लहान शेतकर्यांना त्याचा सर्वात मोठा फायदा होइल. नॅनो युरीया वापरासंबंधीच्या शिफारशी तसेच हरभरा या पिकाला खते देण्यासंबंधीच्या शिफारशी विद्यापीठाकडून मिळाल्या तर त्या शेतकर्यांना अधिक फायदेशीर होतील. विद्यापीठाने उन्हाळी भूईमुगाच्या बियाण्याची कमतरता दूर करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. यावेळी झालेल्या तांत्रिक सत्रात डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. सुरेश दोडके, डॉ. मधुकर भालेकर, डॉ. मिलिंद देशमुख आणि डॉ. विरेंद्र बारई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शरद गडाख  यांनी सन 2020 मधील प्रसारीत वाणांचे व शिफारशींचे सादरीकरण केले. याप्रसंगी कृषि विभागाचे संचालक श्री. विकास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ यांनी केले. यावेळी पुणेचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. बसवराज बिराजदार, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक श्री. संजीव पडवळ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी कृषि विभागाचे अधिकारी, कृषि विद्यापीठातील सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक आणि शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते.

COMMENTS