Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार भूषणावह ः प्रा. दिलीप सोनवणे

श्रीरामपूर ः संत हे समाज आणि साहित्याचे दीपस्तंभ आहेत. त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श जपले पाहिजेत श्रीरामपूरच्या श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानच

बाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हील हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांकडून तोडफोड
नागवडे स्कूलने केला गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान
मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात

श्रीरामपूर ः संत हे समाज आणि साहित्याचे दीपस्तंभ आहेत. त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श जपले पाहिजेत श्रीरामपूरच्या श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानचे संतसाहित्य पुरस्कार नव्या पिढीला भूषणावह ठरणारे असल्याचे मत संगमनेर येथील प्रा. दिलीप सोनवणे यांनी व्यक्त केले.
येथील माजी मुख्याध्यापक भागवतराव विठ्ठलराव मुठे पाटील यांच्या’ श्रीमद भागवत रहस्य’ या अनुवादित ग्रंथास श्रीसंत गोरा कुंभार संतसाहित्य पुरस्कार प्रदान करताना श्रीसंत गोरा कुंभार संतसाहित्य पुरस्कार विजेते साहित्यिक प्रा. दिलीप सोनवणे बोलत होते.तसेच यावेळी छायाताई सोनवणे यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका शिरसगाव येथील प्राचार्या सुमतीताई रावसाहेब औताडे यांचा तर आदर्श गृहिणी रोहिणी गुंड यांचा मंदाकिनी उपाध्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी गंगाराम सोमवंशी, नीतीन जोर्वेकर यांचाही सन्मान काण्यात आला. प्रा. दिलीप सोनवणे यांनी श्रीरामपूरची वाचन संस्कृती ही मराठी भाषा, संस्कृती, माणूस आणि लेखन तसेच संतसाहित्य चळवळीला प्रतिष्ठा देत आहे हे कार्य आजच्या तंत्रयुगात प्रेरणादायी कार्य आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये आणि त्यांच्या मित्रपरिवाराने त्यासाठी वाहून घेतले हे भूषणावह, प्रेरणादायी आहे, याच चळवळीमुळे मी आणि आमचे अनेक सहकारी लिहिते झालो आहोत, संगमनेर येथील श्रीसंत गोरा कुंभार पुण्यतिथी कार्यकमात माझा सत्कार झाला असल्याचे सांगून श्रीरामपूरचे मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील, प्राचार्या औताडे आदिंच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक भागवतराव मुठे यांनी श्रीमद भागवत रहस्य पुस्तकाचे वेगळेपण सांगितले. संतसाहित्य पुरस्कार हे माझ्या लेखनाला लाभलेला संतांचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. मंदाकिनी उपाध्ये यांनी आभार मानले.

COMMENTS