Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वेने केले 6 हजार किलोमीटर लोहमार्गाचे विद्युतीकरण

भारतीय रेल्वेने एकाच वर्षात 6 हजार 15 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे. गेल्या वर्षी 2018-19 मध्ये रेल्वेने 5,276 किमीचे रेल्वेमार्गांचे केले होते.

येवल्यातील बोकटे येथील काल भैरवनाथ यात्रेला प्रारंभ |
 चांदवडला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ ; चावा घेतल्याने सहा जण जखमी
सिंहस्थमेळा; साधुग्रामसाठी 300 एकर भूसंपादनाचा अहवाल पाठवा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने एकाच वर्षात 6 हजार 15 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण पूर्ण करत नवा विक्रम रचला आहे. गेल्या वर्षी 2018-19 मध्ये रेल्वेने 5,276 किमीचे रेल्वेमार्गांचे केले होते. रेल्वेने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत 2020-21 या वर्षात तब्बल 6 हजार 15 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण केलेय. त्यामुळे भारतीय रेल्वे अधिकाधिक पर्यावरणपूरक आणि ऊर्जेच्या दृष्टीनेही सक्षम बनली आहे.

भारतीय रेल्वेचे सध्याचे ब्रॉड गेज नेटवर्क 63,949 किमी इतके असून त्यात कोकण रेल्वेचे 740 किमी धरल्यास, हे एकूण 64,689 किमी मार्ग इतके आहे. यापैकी एकूण 45,881 किमी मार्ग म्हणजेच 71 टक्के विद्युतीकरण 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण झाले आहे. अलीकडच्या काळात, देशाचे आयातीत पेट्रोलियम इंधन म्हणजेच डीझेलवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीने, तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने, एक पर्यावरण पूरक, जलद आणि उर्जा सक्षम अशा सार्वजनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देण्याच्या विचाराने, अलीकडच्या काही वर्षात रेल्वेच्या विद्युतीकरणावर मोठा भर देण्यात आला आहे. गेल्या सात वर्षात म्हणजेच 2014 ते 21 या काळात, आधीच्या सात वर्षांच्या म्हणजेच 2007-14 या काळाच्या तुलनेत, पाच पटपेक्षा अधिक विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. 2014 पासून आजपर्यंत 24,080 किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले असून एकूण कामांपैकी 37 टक्के काम पूर्ण झाले आहे. वर्ष 2007-14 या काळात 4,337 केवळ किमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले होते. आतापर्यंत एकूण 45,881 रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले असून, त्यापैकी 34 टक्के काम गेल्या 3 वर्षात पूर्ण झाले आहे.भारतीय रेल्वेने वर्ष 2020-21 मध्ये 56 कर्षण उपकेंद्रे लोकार्पित केले आहेत, याआधी केवळ एका वर्षात 42 कर्षण उपकेंद्रे बांधून झाली होती, उपकेंद्र बांधणीच्या वेगातही कोविड काळात 33 टक्के सुधारणा झाली आहे. गेल्या 7 वर्षात रेल्वेने एकूण 201 कर्षण उपकेंद्रे बांधून पूर्ण केली आहेत. भारतीय रेल्वेने आपल्या सर्व रेल्वेमार्गाचे डिसेंबर 2023 पर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. संपूर्ण विद्युतीकारणाचे उद्दिष्ट साध्य केल्यास, वर्ष 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात रेल्वेचा मोठा हातभार लागू शकेल.

COMMENTS