राष्ट्रपित्याला अभिवादन करताना.....!खरे तर राष्ट्रपिता म.गांधी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महानुभव समकालीन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत
राष्ट्रपित्याला अभिवादन करताना…..!खरे तर राष्ट्रपिता म.गांधी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महानुभव समकालीन. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उभयंतांनी दिलेले योगदान समतूल्य आणि अनन्य आहे. विचारांच्या मुद्यांवर या उभय विभूतींमध्ये टोकाचे मतभेद दिसत असले तरी व्यापक राष्ट्रहित ,जनहिताला या मतभेदांनी अडचणीत आणले नाही,खरेतर तत्कालीन विशिष्ट विचारसरणीच्या मंडळींनी हे दोन्ही विचार सोबत आणि समांतरही चालणार नाहीत याची विशेषत्वाने काळजी घेतली.त्याचा परिणाम आजही भारत वर्षात जाणवत आहे.
भारतीय समाजकारण आणि राजकारणात गांधी आणि आंबेडकर विचारसरणीला पर्याय नाही.किंबहूना या दोन्ही विचारसरणी वगळून केलेले समाजकारण आणि राजकारणही मिठाशिवाय जेवण तयार करण्यासारखे आहे.हेच वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर मिठासारखेच जीवन चवदार बनविणाऱ्या या विचारसरणींना नीटपणे हाताळले नाही तर समाजस्वास्थ, पाठोपाठ राजकारण आणि एकूणच लोकशाही व्यवस्था बाधीत होते.या जाणीवेतूनच या दोन्ही विचारसरणी एकत्र येऊ न देण्याची खेळी एक विशिष्ट वर्ग स्वातंत्र्यपुर्व काळापासून खेळत आहे.यातूनच सुधारलेल्या भारत वर्षातही आंबेडकरी जनता आणि ओबीसी प्रवर्ग असा सरळ भेद आजही प्रभावीपणे मुद्दामहून अंमलात आणला जात आहे.खरे तर राष्ट्रपिता म.गांधी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दोन्ही महानुभव समकालीन.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उभयंतांनी दिलेले योगदान समतूल्य आणि अनन्य आहे.विचारांच्या मुद्यांवर या उभय विभूतींमध्ये टोकाचे मतभेद दिसत असले तरी व्यापक राष्ट्रहित ,जनहिताला या मतभेदांनी अडचणीत आणले नाही,खरेतर तत्कालीन विशिष्ट विचारसरणीच्या मंडळींनी हे दोन्ही विचार सोबत आणि समांतरही चालणार नाहीत याची विशेषत्वाने काळजी घेतली.त्याचा परिणाम आजही भारत वर्षात जाणवत आहे.इतिहासात मिळणाऱ्या काही दाखल्यांचा संदर्भ घेऊन सांगायचे म्हटले तर म.गांधींनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला तर या उलट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शहरी भागातच विकासाची संधी असल्याचे समाजमनावर बिंबवले.अर्थात या दोघांच्याही या विचारामागे तत्कालीन कारणे दडलली आहेत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी विकास सर्वार्थाने साधला गेला तर भारताचा राष्ट्र म्हणून विकास होईल. कृषी विकास करायचा म्हणजे खेड्याकडे लक्ष देणे अपरिहार्य.या दृष्टीने राष्ट्रपिता म.गांधींनी खेड्यांचा विकास हा मंत्र सांगीतला. तथापी त्या काळात समाजकारणात प्रचंड बोकाळलेल्या जातीय वादाने दीन दलीत उपेक्षीत वर्गाला नागवले होते.त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी सोडा मुक्तपणे जगण्याचा हक्कही नाही.इथपर्यंत ही मानसिकता सडली होती,प्राप्त परिस्थितीचे खरे अवलोकन झाल्यानंतर बाबासाहेबांनी या पिचलेल्या समाजाला शहरांचा मार्ग दाखवला. आज परिस्थिती बदलली आहे असे वाटत असले तरीब्रिटिशांचे आर्थिक धोरण व ब्राह्मण बनिया शासक शोषकांची पाश्चात्यांकडून आयात तंत्रज्ञानावर आधारलेली लोकशाही यांनी उत्पादक कसबी कलाकार असलेल्या ओबीसींचे उद्योगव्यवसाय संपवून ओबीसींना देशोधडीला लावले आहे. आज भारतीय लोहारांच्या मालकीचे लोखंडाचे कारखाने किती आहेत ? विणकर कोष्टी यांच्या मालकीच्या कापड गिरण्या किती आहेत ? चांभारांच्या मालकीचे चपला बुटांचे कारखाने किती आहेत ? गवंडी – भिस्ती यांच्या मालकीचे बांधकाम व्यवसाय किती आहेत ?
डॅा आंबेडकर यांनी पूर्वास्पृश्यांना ‘शहराकडे चला’ असा संदेश दिला. शहरात श्रम विकण्याचे सापेक्ष स्वातंत्र्य असते. म्हणून शहरात येऊन अनुसूचित जातींची थोडीफार प्रगती झाली. ओबीसींनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले. गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली. म्हणून बहुसंख्य ओबीसी ग्रामीण भागातच राहिले.भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारलेली आहे. या अर्थव्यवस्थेला ब्राह्मण बनिया या अखिल भारतीय स्तरावरील सत्ताधारी जाती तुच्छ लेखतात. उद्योगपतींना माफ झालेली ‘कर्जे’ व शेतकऱ्यांना केलेली ‘मदत’ यांची आकडेवारी नजरेखालून घाला. ती शोधायला वेळ नसेल तर दिल्लीतील शेतकरी आंदोलन उघड्या डोळ्यांनी बघा.उच्च जातीची शेतकरी जातींबाबत असलेली जातीय तुच्छता कशी वैमनस्यात रुपांतरीत झाली आहे , हे समजून येईल. इतिहासकाळात अज्ञात असलेल्या शेतकरी आत्महत्या आता सर्रास होत आहेत.ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरीच जर आत्महत्या करण्याइतपत असहाय्य असेल तर तेथील उत्पादक कसबी (सेवेकरी) ओबीसी जाती ज्यांना ढोबळमानाने अलुतेदार बलुतेदार असेही म्हटले जाते त्या कशा काय टिकाव धरणार ? म्हणून ग्रामीण भागात जास्त संख्येने ओबीसी असणे हा येथील शासक शोषक जातींच्या ध्येयधोरणांचा नतीजा आहे, सखेद आश्चर्याची गोष्ट ही की , याच शासक शोषक जातींचे धार्मिक आयडॅाल व संस्कृतीचे वाहक होण्यात ओबीसी जाती धन्यता मानीत आहेत. एवढेच नव्हे तर शेतकरी जातीही ब्राह्मणी धर्म संस्कृतीच्या समर्थक आहेत. म्हणून तर उच्च जातीच्या प्रवृत्ती निर्धास्त आहेत.हे गुपीत समजून आले तर राष्ट्रपित्याची जयंती साजरे करण्याचे सार्थक झाले असे म्हणता येईल.
COMMENTS