एअर इंडियाची ‘घर वापसी’ ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

एअर इंडियाची ‘घर वापसी’ ?

एकेकाळी टाटा समूहाच्या मालकीची असलेली एअर इंडिया कंपनीचे भारत सरकारने राष्ट्रीयीकरण केल्यानंतर या कंपनीवरील टाटांची मक्तेदारी संपुष्टात आली. मात्र पु

शिवसेनेची झालेली वाताहत
आम्ही मूकनायकाचे वारसदार
पाणीटंचाईचे संकट


एकेकाळी टाटा समूहाच्या मालकीची असलेली एअर इंडिया कंपनीचे भारत सरकारने राष्ट्रीयीकरण केल्यानंतर या कंपनीवरील टाटांची मक्तेदारी संपुष्टात आली. मात्र पुन्हा एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे जाण्याची चिन्हे आहेत. यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी देखील, टाटा समूह एअर इंडिया खरेदीसाठी इच्छूक आहे.
जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून त्याचे नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी भारत सरकारने घेतली होती. 1953 मध्ये याचे पूर्ण राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. मात्र 67 वर्षांच्या इतिहासानंतर एअर इंडियाची पुन्हा एकदा घरवापसी होणार असून, ती टाटा समूहाकडे परतणार आहे. 67 वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या या कंपनीला ग्रहण लागले आहे. एअर इंडिया चालविण्यात केंद्र सरकारला कोणताही रस नसल्याचे दिसून येत आहे. दूरदृष्टीचा अभाव, पारदर्शकता, तकलादू धोरणांमुळे एअर इंडिया कर्जाच्या विळख्यात रूतत गेली. कर्जाचा हा विळखा इतका घट्ट होता की, एअर इंडिया व्रिकी करण्याशिवाय केंद्र सरकारसमोर कोणताही पर्याय नव्हता. तब्बल 60 हजार कोटीपेक्षा अधिक कर्ज या कंपनीला देणी असल्यामुळे, कर्मचार्‍यांचा पगार वेळेवर होत नव्हते. शिवाय देणी कशी चुकवायची हा, देखील महत्वाचा प्रश्‍न होता. अशावेळी एअर इंडियाची विक्री करण्याशिवाय केंद्र सरकारसमोर पर्याय नव्हता. एअर इंडियाला खरेदी करण्यास टाटा सन्सने रुची दाखविल्यामुळे एअर इंडियावर पुन्हा एकदा टाटा सन्सची मालकी प्रस्थापित होणार आहे. एअर इंडियामध्ये एकूण 14 हजार कर्मचारी आहेत.‘एअर इंडिया’मधील 100 टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारने बोली मागविल्या आहेत. सरकारने यावेळी ‘एअर इंडिया’च्या विक्रीच्या अटी बदलल्या आहेत. त्याअंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसमधील 100 टक्के हिस्सेदारी विकली जाईल. सद्यःस्थितीत एअर इंडियावर 60,074 कोटी रुपयांचे कर्ज आहे, परंतु अधिग्रहणानंतर खरेदीदाराला केवळ 23,286.5 कोटी रुपये द्यावे लागतील. उर्वरित कर्ज, स्पेशल पर्पज व्हेइकल एअर इंडिया सेट होल्डिंग्ज लि.कडे हस्तांतरित केले जाईल, अर्थात बाकीच्या कर्जाचे ओझे सरकार उचलणार आहे. टाटा समूहाने ‘एअर इंडिया’ला खरेदी करण्यात रुची दाखविली असून, त्यांनीदेखील यासाठी बोली लावली होती. सध्या टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर एअर लाईन्ससोबत मिळून विस्तारा एअरलाईन्स चालवतात. या जॉइंट व्हेंचरमध्ये टाटा समूहाचा वाटा 51 टक्के तर सिंगापूर एअरलाईन्सचा वाटा 49 टक्के आहे. याशिवाय एअर एशिया इंडियामध्येही टाटाची 51 टक्के भागीदारी आहे. या एअरलाईन्समध्ये उर्वरित 49 टक्के भागीदारी मलेशियन व्यावसायिक टोनी फर्नांडिस यांची आहे. मार्केट शेअरच्या दृष्टिने बघितल्यास इंडिगो, स्पाईसजेट, एअर इंडिया आणि गो एअर यांच्यानंतर विस्तारा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे एअर एशिया इंडियासुद्धा एक छोटी विमान कंपनी आहे. ती सहाव्या-सातव्या क्रमांकावर आहे. टाटाला विमान उड्डाण व्यवसायात पुढे जायची महत्वाकांक्षा असल्यामुळे एअर इंडिया खरेदी करणे त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. कर्जाचा मुद्दा बाजूला ठेवला तर एअर इंडियाचे अनेक सकारात्मक पैलू आहेत. टाटाकडे उत्तम दर्जाची एरोनॉटिकल संपत्ती आहे. म्हणजेच चांगली विमाने, प्रशिक्षित वैमानिक, इंजिनिअर आणि इतर प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे. कंपनीचे जगातील अनेक शहरात स्लॉट्स आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात एअर इंडियाचे जवळपास 18 टक्के, राष्ट्रीय बाजारात जवळपास 13 टक्के शेअर आहेत. त्यामुळे हे सगळे बघता टाटाचा एअर इंडिया खरेदीत रस असणे स्वाभाविक आहे. व्यावसायिक आकडेवारीवर नजर टाकल्यास टाटा समुहाचीही स्थिती उत्तम आहे. कंपनीच्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 729,710 कोटी होता. तर 31 मार्च 2019 रोजी टाटा समुहाचे मार्केट कॅपिटल 1,109,809 कोटी होते. हा व्यवहार यशस्वी झाला तर टाटा समुहासाठी हा फायद्याचा सौदा ठरणारा आहे. त्यामुळे एअर इंडिया जर टाटा सन्सकडे परत आल्यास एअर इंडियाला पुन्हा एकदा नवी झळाळी मिळू शकते.

COMMENTS