राजारामबापू पाटील सहकारी बँकेला 40.57 कोटींचा नफा; अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांची माहिती

Homeमहाराष्ट्रसातारा

राजारामबापू पाटील सहकारी बँकेला 40.57 कोटींचा नफा; अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांची माहिती

राजारामबापू पाटील सहकारी बँकेला 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 40.57 कोटींचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली.

…तर सोमय्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू | LOKNews24
भिशीचे पैसे भरण्याच्या वादातून पत्नीने केला पतीचा खून l LOKNews24
वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून ६ जणांची बाईकवर स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल

इस्लामपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी बँकेला 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 40.57 कोटींचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली. 

राजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या गत आर्थिक वर्षांचा आढावा पत्रकार परिषदेत घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. जाखले, संचालक, संजय पाटील, डॉ. प्रकाश पाटील, माणिक पाटील, सुभाष सूर्यवंशी, धनाजी पाटील, डॉ. दीपा देशपांडे, जगन्नाथ स्वामी, नामदेव मोहिते, संभाजी पाटील, माजी संचालक बाबुराव हुबाले उपस्थित होते. 

अध्यक्ष प्रा. शामराव पाटील म्हणाले, गतवर्षी कोरोनाच्या संकटाचा फटका वित्तिय संस्थाना बसला. वर्षभरात कोविडचा सामना करत नफा झाला. निव्वळ एनपीए शून्य टक्के राहिला आहे. वसुली चांगली झाली आहे. बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. 46 शाखा आहेत. लोकनेते राजारामबापू यांनी सन 1981 मध्ये स्थापन केलेली बँक आत्ता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. एटीएम, कॅशलेस, मोबाईल बँकिंग, पेटीएम सुविधा ग्राहक वापरत आहेत. त्यामुळे नवे आव्हान स्वीकारून कार्यरत आहोत. आम्ही कॅश डिपॉझिट, पासबुक प्रिंटींग मशीन बसवल्या आहेत. शैक्षणिक, वाहन, गृह, शेती, घरदुरुस्ती आदी कर्ज उपलब्ध करून दिली आहे. डॉक्टरांसाठी मशिनरी, रुग्णवाहिका खरेदीसाठी व्याज दर माफक आहेत.

ते म्हणाले, बँकेने गेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा 14 कोटी 55 लाख रुपयांचा मिळवला आहे. इन्कमटॅक्स म्हणून 4 कोटी 45 लाख रुपये भरले आहेत. बँकेत 2166.75 कोटीच्या ठेवी आहेत. ठेव कर्जाचा रेशो 66.56 इतका आहे. 1441.66 कोटींचे कर्ज वितरण केले आहे. ढोबळ एनपीए शून्य टक्के आहे. गेली अनेक वर्षे निव्वळ एनपीए शून्य ठेवण्यात यश मिळवले आहे. ढोबळ नफ्यातून बुडीत व संशयीत निधी म्हणून 20 कोटींची तरतूद केली आहे. आम्ही कर्मचार्‍यांना 20 ते 32 टक्के पर्यंत बोनस देतो. रिझर्व्ह बँकेने 2023 पर्यत को. ऑपरेटिव्ही बँकेत 25 लाखांच्या आतील कर्जे जास्तीत-जास्त वितरित केली पाहिजेत असे धोरण तयार केले आहे. म्हणून आम्ही छोटी कर्जे वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अवघ्या 9 टक्के व्याजदरात आम्ही कर्ज पुरवठा करणार आहोत. छोट्या गरजू लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आहे..

COMMENTS