गरिबांसाठी काँग्रेसने काहीच केले नाही- पंतप्रधान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गरिबांसाठी काँग्रेसने काहीच केले नाही- पंतप्रधान

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष दिवसातून शंभर वेळा गरीब शब्दाचा जाप करतो. गेल्या 6 दशकात काँग्रेसने गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काहीच केले नसून काँग्रे

महागाईबद्दल मोदींनी जनतेची माफी मागावी : थोरात
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची धुरा भारताच्या हाती
सहकार क्षेत्रातील तरतूदी असंवैधानिक : शरद पवार

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष दिवसातून शंभर वेळा गरीब शब्दाचा जाप करतो. गेल्या 6 दशकात काँग्रेसने गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठी काहीच केले नसून काँग्रेसच्या स्वभावात दांभिकपणा असल्याचे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मध्यप्रदेशच्या लाभार्थ्यांशी आभासी माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेस सरकारमध्ये एक वेगळीच विकृती होती. एखाद्याने दिवसभर एकचएक गाणे म्हणावे, तसे काँग्रेस पक्ष गरीब या शब्दाचा उच्चार करीत आलेला आहे. अगदी 60 वर्षांच्या सत्ताकाळात या पक्षाने फक्त गरिबी दूर करणार, असे आश्वासन देऊन निवडणुका जिंकलेल्या आहेत. इतक्या दीर्घकाळात गरिबी का दूर झाली नाही, असा सवाल पंतप्रधानांनी केला. केंद्रातून काँग्रेसला नागरिकांनी दूर केले आणि ठोस पर्याय आणला. भाजपा सरकारने मागील सात वर्षांच्या गरिबांच्या उत्थानासाठी अनेक योजना अंमलात आणल्या आणि त्या सर्व योजनांचे थेट फायदे थेट लाभार्थ्यांना प्राप्त करून दिले. गरिबांचे हात बळकट करण्यावरच माझ्या सरकारने भर दिला आहे.

पक्के रस्ते, वीज, हक्काचे घरकुल, स्वयंपाकाचा गॅस आणि बँकिंग यासार’या मूलभूत गरजांपासून गरिबांना आतापर्यंत का वंचित ठेवण्यात आले, गावांचा विकास का होऊ शकला नाही, सरकारी योजनांचे लाभ थेट त्यांना का मिळू शकला नाही, दलालांच्या मार्फत त्यांना हक्काचा मोबदला देण्याचे धोरण का स्वीकारण्यात आले होते, यासह अनेक प्रश्नांची उत्तरे काँग्रेसने देशाला द्यायला हवी. दिवसातून शंभरवेळा गरीब या शब्दाचा उच्चार करून गरिबी दूर होत नाही, तर त्यांच्यासाठी प्रत्यक्षात काही वेगळे करण्याची आवश्यकता असते, असे त्यांनी सांगितले.

लसीकरणाने गाठला 50 कोटींचा टप्पा

कोरोना साथरोग आजवरचे सर्वात मोठे संकट ठरले आहे. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नसल्याने, नागरिकांनी निष्काळजीपणे वागू नये. भौतिक दूरता, मुखाच्छादन आणि हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करा आणि स्वत:सोबतच इतरांनाही सुरक्षित ठेवा. शुक्रवारी आपल्या देशाने लसीकरण मोहिमेत 50 कोटींचा टप्पा गाठला आहे. हा एक मैलाचा दगड असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

COMMENTS