Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यश

बहुसंख्य विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.) यांच्या मार्फत फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी बोर्डाच्या प

नगरच्या शिक्षणाधिकारी, कक्ष अधिकार्‍यांवर कारवाई होईल का ?
संजीवनीचे 52 अभियंते एक्साईडच्या सेवेत दाखल ः अमित कोल्हे            
जादा पैसे घेणार्‍या रुग्णवाहिकेवर होणार कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई.) यांच्या मार्फत फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव उंचावले आहे.  
इयत्ता दहावी मध्ये श्रेया पितळे (97 टक्के) तर बारावी मध्ये विज्ञान शाखेत अक्ष गांधी (84.4 टक्के) आणि बारावी वाणिज्य शाखेत श्‍लोक नय्यर (88.4 टक्के) याने विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. संस्थेचे संचालक शांताराम हेगडेकट्टे व प्राचार्य जयश्री मेहेत्रे यांनी गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन करुन कौतुक केले. तर विद्यार्थ्यांनी यशाची उत्तम शिखरे गाठावी व सक्षम होऊन देश विकासाला हातभार लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.
शाळेत इयत्ता दहावी मध्ये प्रथम- श्रेया पितळे (97 टक्के), द्वितीय- मानसी पवार (95.6 टक्के), तृतीय- मेहमूदा नबिया (95 टक्के), सृष्टी बोडखे (95) आणि सायली निमसे (95 टक्के) यांनी क्रमांक मिळवला आहे. बारावी मध्ये विज्ञान शाखेत प्रथम -अक्ष गांधी (84.4 टक्के), द्वितीय- आरोन पेरीरिया (80.6 टक्के), तृतीय- हर्षल बेरड (79 टक्के) आणि बारावी वाणिज्य शाखेत प्रथम- श्‍लोक नय्यर (88.4 टक्के), द्वितीय- आशिष सगम (78.4 टक्के), तृतीय- आयुशी शिरसाट (77.2 टक्के) या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
इयत्ता दहावी मधील वेदिका कुलकर्णीने हिने मराठी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहे. तसेच श्रेया पितळेला हिंदी आणि गणित विषयात 99 गुण, इंग्रजी विषयात सुरभी कुटेला 99 गुण, गणित विषयात सृष्टी बोडखेला 99 गुण आणि माहिती तंत्रज्ञान विषयात मोहम्मद ओमर खान, मेहमूदा नबीहा आणि निलाक्ष होले यांना 99 गुण मिळाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना समन्वयक तन्वीर खान, ओमकार बिष्ट, मुबिना शेख, नीरज वोहरा, बाळासाहेब लिमकर, सुमित राज, श्‍वेता शिरसाठ, कल्पना गवारे, प्रज्ञा क्षीरसागर, सुनंदा पाटील, प्रियंका सिंग, प्रदिप पाटोळे, श्‍वेता शर्मा आणि भारती सखराणी या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS