आज सत्ता आणि सरकार सांगेल तशी पत्रकारीता सुरू…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आज सत्ता आणि सरकार सांगेल तशी पत्रकारीता सुरू…

अकोले प्रतिनिधी-   स्वातंत्र्यापुर्वीची पत्रकारीता ध्येयवादी होती.मात्र हल्लीच्या पत्रकारीतेत दिपस्तंभच राहिले नाहीत .आज सत्ता आणि सरकार सांगेल तश

महिलांना शिक्षण देण्याचा महात्मा फुलेंचा निर्णय क्रांतीकारी होता
शनेश्वर प्रतिष्ठानाच्या वतीने ; रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू
गांजाची विक्री करणारा सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त 

अकोले प्रतिनिधी-  

स्वातंत्र्यापुर्वीची पत्रकारीता ध्येयवादी होती.मात्र हल्लीच्या पत्रकारीतेत दिपस्तंभच राहिले नाहीत .आज सत्ता आणि सरकार सांगेल तशी पत्रकारीता सुरू असल्याची खंत जेष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

               लोकशाहीचा चौथा प्रभावी स्तंभ असणारी पत्रकारीता राजकारणी लोकांनी बिघडविली. लोकजागरा ऐवजी लांगुलचालनाची सवय लागल्याने समाजात पत्रकारांवरील विश्वास उडाल्याचे महादेव कुलकर्णी म्हणाले.

               अकोले येथील आनंदोत्सव चँरिटेबल ट्रस्ट, पु.बा. टाकळकर ग्रंथालय,अकोले तालुका पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ पत्रकार महादेव मनोहर कुलकर्णी यांचे वयाचे 75 वर्षपुर्ती निमीत्त अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. साहित्यिक माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांचे अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भुषण देशमुख, अकोले पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर,  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

               सत्काराला उत्तर देताना पुर्वीची आणि आताच्या पत्रकारीतेचा तौलनिक अभ्यास त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.पत्रकारीतेचे व्यावसायिकरण झाले आणि हे क्षेत्र बिघडले. पैसा गोळा करणे हा एकमेव उद्योग सुरु झाल्याने राजकारण्यांनी बरोबर फायदा उचलला.पत्रकारांनी आता स्पेशलायझेशनकडे वळायला हवे.एकांगी लिखाण करु नये. महागाई, शेती, रोजगार, सहकार या जनतेशी निगडीत प्रश्नावर लिहीते व्हायला हवं. ग्रामीण विकासाच्या ध्यासाची पत्रकारीता असावी. पत्रकारांनी वाचन,चिंतन,मनन केल्यास पुर्वीसारखी सरकारला सल्ला देणारी पत्रकारीता सुरु होईल. सांप्रत स्थितीत मात्र सरकारला पत्रकारीतेऐवजी उद्योजक सल्ले देत असल्याची टीकाही महादेव कुलकर्णी यांनी केली.

                डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले,समाजाच आकलन करुन तात्काळ व्यक्त होणार मातृह्रदय महादेव कुलकर्णी यांच्या पत्रकारीतेत होतं. त्यांनी अनेक पत्रकारांना दिशा दिली.त्यांचे पत्रकारीतेत प्रेम, सत्य आणि करुणेची चेतना होती.पत्रकार हा समाजाचा आवाज असल्याने तो टिकवायचा असेल तर जनतेच्या आवाजाला न्याय देणारी पत्रकारीता करा असे आवाहन डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी केले.

             साहित्यिक प्रा.शांताराम गजे, प्रा.डी.के. वैद्य, शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर, शांताराम काळे यांनी आपल्या भाषणातून कुलकर्णी यांचे पत्रकारीतेतील योगदान उपस्थितांसमोर मांडून त्यांना शुभेच्छा दिल्या.

           स्वागत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, प्रास्ताविक शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी तर सुत्रसंचालन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी केले. मानपत्राचे वाचन अनिल सोमणी यांनी केले. आभार पत्रकार चंद्रशेखर हासे यांनी मानले. किशोर देशमुख यांनी गायिलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

               कार्यक्रमास सौ.उषा सहस्त्रबुद्धे, साहित्यिक पुंडलिक गवंडी, ह.भ.प. अशोकानंद कर्डिले महाराज, प्रा.मच्छिंद्र मालुंजकर, श्रीपाद कुलकर्णी, बाळासाहेब गाडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, मच्छीन्द्र मंडलिक, शरद रत्नपारखी,  तालुकाध्यक्ष अशोकराव उगले, सचिव अनिल नाईकवाडी, दीपक पाचपुते, भाऊसाहेब कासार, राजेंद्र भाग्यवंत,अनिल पवार, प्रकाश महाले, ज्ञानेश्वर खुळे, हेमंत आवारी, सोशल मीडिया प्रमुख गणेश रेवगडे,  संजय शिंदे हे उपस्थित होते.

COMMENTS