मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

प्रतिनिधी : मुंबई पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अ

पक्ष पळवणार्‍यांची टोळी सक्रिय
मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते- उद्धव ठाकरे
आमचे वैचारिक व्यासपीठ एकच – उद्धव ठाकरे

प्रतिनिधी : मुंबई

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कोण होते पंडित दीनदयाळ उपाध्याय?

पं. दीनदयाळ उपाध्याय १९३७ साली कानपूर येथे संघाचे स्वयंसेवक झाले व १९४२ मध्ये प्रचारक झाले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव होता. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांच्या चिंतनातून व मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा सिद्धान्त मांडला व भारतीय समाजापुढे ठेवला.

११ फेब्रुवारी इ.स. १९६८ रोजी दीनदयाळांची अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. मुघलसराय स्टेशनच्या रुळांजवळ त्यांचे शव आढळले होते. आता या जंक्शनचे नाव पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन असे करण्यात आले आहे.

COMMENTS