Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते- उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी - नरेंद्र मोदी मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारच असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्र

शिवसेना भवन, पक्षाची संपत्ती ठाकरेंकडेच
वर्ष सरता-सरता सरकारही जाईल ः उद्धव ठाकरे
निवडणुका घेण्याची सरकारला भीती

मुंबई प्रतिनिधी – नरेंद्र मोदी मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणारच असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील जागा वाटप जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणार असल्याचे स्पष्ट केले. 

आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष कार्यालय ‘शिवालय’ येथे पार पडली. यामध्ये जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदींसह इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, महाविकास आघाडी व्यापक होईल यासाठी प्रयत्न आम्ही केले. प्रकाश आंबेडकर यांना काही जागा देऊ केल्या होत्या. आता ते काही जरी बोलले तरी आम्ही काही बोलणार नाही. आम्हाला अजूनही त्यांच्याबद्दल आदर असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपवर निशाणा साधताना उद्धव यांनी म्हटले की, काल (सोमवार, 8 एप्रिल रोजी) तीन गोष्टीचा एकत्रित योग होता.  अमावस्या होती, ग्रहण होत आणि यांची सभा होती.  काल जे भाषण झालं ते पंतप्रधान यांचे भाषण नव्हते. ते भेकडं जनता पक्षाचे नेते मोदी यांचे भाषण होते.  भाजपमध्ये ताकद नाही म्हणून भेकडं म्हणत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

COMMENTS