महाबळेश्‍वर तालुक्यातील कांदाटी खोर्‍यातील 19 गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखलं

Homeमहाराष्ट्रसातारा

महाबळेश्‍वर तालुक्यातील कांदाटी खोर्‍यातील 19 गावांनी कोरोनाला वेशिवरच रोखलं

कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार करीत गावेच्या गावे बाधित करीत हातपाय पसरले असताना महाबळेश्‍वर तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यातील 19 गावांनी मात्र गेल्या पंधरा महिन्यात कोरोनाला गावात फिरकू दिले नाही.

महत्वाच्या रेल्वेगाड्यांना आता कर्जत, पनवेल, रोहा, लोणावळ्यात थांबा
संगणक अभियंता ‘सेक्सटॉर्शन’च्या जाळ्यात
 प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पाचगणी / वार्ताहर : कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार करीत गावेच्या गावे बाधित करीत हातपाय पसरले असताना महाबळेश्‍वर तालुक्यातील पश्‍चिम पट्ट्यातील 19 गावांनी मात्र गेल्या पंधरा महिन्यात कोरोनाला गावात फिरकू दिले नाही. या करिता स्थानिक पातळीवर ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने राबविल्यालेल्या कोव्हिडं नियमाचे काटेकोर पालन यामुळे ही गावे आजही कोरोनाच्या प्रादूर्भावापासून कोसो दूर आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यात 111 गावे असून सर्वच गावे कोरोनाचा शिकार झाली आहेत. मात्र, कांदाटी खोर्‍यातील 19 गावांनी गेल्या 15 महिन्यापासून विविध उपाययोजना राबवित स्वतःची गावे कोरोना संसर्गाच्या विषाणूपासून दूर ठेवली आहेत.

यामध्ये आमशी, रामेघर, शिंदी, वलवन, आकल्पे, निवळी, आरव, मोरणी, उचाट या नऊ ग्रामपंचायती आहेत तर या ग्रामपंचायती अंतर्गत येणारी 10 गावे यामध्ये सोनाट, खांबील पोकळे, मजरेवाडी, चकदेव, म्हाळुंगे, दोडणी, कांदट, झाडणी, पिंपरी, तांब, शिरगार या गावांनी कोरो


ना आपल्या गावांना स्पर्श सुध्दा करू न देता गाव वेशिवरून दूर लोटलं. 

कांदाटी खोर्‍यातील या गावांचा संपर्क बाजारासाठी कोकणातील खेड शहराशी येतो. येथील ग्रामस्थांनी कोकणातून येणारे रस्ते बंद करून येणार्‍या व्यक्तीस होम क्वारंनटाईन नियम पालन करणे सक्तीचे केले. तसेच मुंबईकर व्यक्तींना हेच नियम लागू केले होते. परंतू मुंबईकर लोकांनी गावाला फिरकने स्वतःच टाळले त्यामुळे गावे संसर्गापासून दूरच राहिली. 

ग्रामपंचायत स्थरावर स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी हातात घालून काम केले. त्यांना मोलाचे मार्गदर्शन येथील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यामध्ये अमोल धुमाळ, (शिंदी वलवन,) प्रकाश मनिराम भोये, (मोरणी आरव) निजाम शेख, (रामेघर), नानासाहेब बनकर, (आमशी) सुनील भोई, (आकल्पे) पोपटराव जगताप, (निवळी) तारळकर (ऊचाट) यांनी ग्रामस्थांच्या साथीने कोरोनाला गावात फिरकू दिले नाही. 

COMMENTS